नवी मुंबईच्या पोस्टमनला चाकुच्या धाकावर तिघांनी ठाण्यात लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 06:37 PM2018-01-25T18:37:28+5:302018-01-25T18:45:27+5:30

चाकुच्या धाकावर लुटमार केल्याच्या प्रकरणात नौपाडा पोलिसांनी एका बालगुन्हेगारास बुधवारी ताब्यात घेतले. त्याचे दोन साथीदार फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

Naval Mumbai's postman looted on the point of knife in Thane | नवी मुंबईच्या पोस्टमनला चाकुच्या धाकावर तिघांनी ठाण्यात लुबाडले

नवी मुंबईच्या पोस्टमनला चाकुच्या धाकावर तिघांनी ठाण्यात लुबाडले

googlenewsNext
ठळक मुद्देएकाच रात्री तीन गुन्हेबाल गुन्हेगारासह तिघांवर कारवाईएक ताब्यात, दोघांचा शोध

ठाणे : नवी मुंबईच्या एका पोस्टमनला चाकुच्या धाकावर लुटणार्‍या एका बाल गुन्हेगारासह तीन आरोपींविरूद्ध नौपाडा पोलिसांनी बुधवारी गुन्हे दाखल केले. या त्रिकुटाने एकाच रात्री तीन गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नवी मुुंबईतील तुर्भे येथे राहणारे पोस्टमन सिताराम मलप्पा पुजारी हे मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास अंधेरी येथील एक कार्यक्रम आटोपून मोटारसायकलने घरी जात होते. कोपरी पुलाजवळील टीएमटी बसथांब्याजवळ ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी तीन तरूणांनी चाकुचा धाक दाखवून त्यांना धमकावले. त्यांची मोटारसायकल, दोन मोबाईल फोन आणि ९ हजार रुपये रोख असा ७६ हजार ५00 रुपयांचा ऐवज घेऊन तिन्ही आरोपी पसार झाले. या प्रकारामुळे हादरलेल्या पुजारी यांनी कसेबसे नौपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत यांनी घटनेचा संदेश तत्काळ वायरलेसवर देऊन यंत्रणेला सतर्क केले. बुधवारी सकाळी नितीन कॅडबरी चौकात नादुरूस्त मोटारसायकल घेऊन उभ्या असलेल्या एका मुलाला पोलिसांनी हटकले. मोटारसायकलला नंबरप्लेट नसल्याने पोलिसांना संशय आला. चौकशी केली असता ती मोटारसायकल तक्रारदार पोस्टमनची असल्याचे समजले. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असता, त्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे उघडकीस आले. त्याच्यासोबतच्या दोन्ही आरोपींची नावे मिळाली असून, त्यापैकी एक जण कोपरी येथील पारशीवाडीचा तर दुसरा वर्तकनगरचा रहिवासी आहे. ते दोन्ही आरोपी बालगुन्हेगार आहेत का, याची चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी सतीश राऊत यांनी सांगितले.
नवी मुंबईच्या पोस्टमनला चाकुच्या धाकावर लुटल्यानंतर, चोरीच्या मोटारसायकलने आरोपींनी वर्तकनगर आणि राबोडी परिसरात अशाच स्वरूपाचे आणखी दोन गुन्हे केल्याची माहितीही समोर येत आहे. पोस्टमनचे दोन्ही मोबाईल फोन आणि रोकड बाल गुन्हेगारांच्या साथीदारांकडे असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Naval Mumbai's postman looted on the point of knife in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.