हत्या, बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक, रिक्षाचालकाने पैशासाठी केले कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 04:54 AM2018-03-12T04:54:49+5:302018-03-12T05:06:59+5:30

अंबरनाथ शहर हादरवून सोडणा-या हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संजय नरवडे (३०) असे त्याचे नाव आहे.

 The murder of the accused in the murder, rape case, and the role done by the autorickshaw driver for money | हत्या, बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक, रिक्षाचालकाने पैशासाठी केले कृत्य

हत्या, बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक, रिक्षाचालकाने पैशासाठी केले कृत्य

Next

अंबरनाथ/टिटवाळा - अंबरनाथ शहर हादरवून सोडणा -चां हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संजय नरवडे (३०) असे त्याचे नाव आहे. तो उल्हासनगरचा रिक्षाचालक असून, त्याने पैशांसाठी ही हत्या केली आणि तरुणीवर बलात्कार केला. अवघ्या सहा दिवसांत त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नरवडे याच्याकडून रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यात आले असून, त्याला टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात चोरी, लूटमार, बलात्काराचे आणि जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात गोंदी पोलीस स्टेशनमध्ये चोरी, लूटमार व इतर गुन्ह्यांची नोंद आहे.
अंबरनाथच्या चिंचपाडा येथून नालंबीकडे जाणाºया डोंगरातील रस्त्यावर गणेश दिनकर हा तरुण आपल्या प्रेयसीसोबत बसला होता. त्याच्याकडे बुलेट गाडी होती. चोरट्याने पैसे उकळण्यासाठी गणेश आणि त्याच्या पे्रयसीला बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. सोबत, मोबाइल आणि बुलेटची चावी मागितली. चावी आणि मोबाइल घेतल्यावर त्याने बंदुकीचा धाक दाखवत, गणेशच्या पे्रयसीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याला गणेशने विरोध करताच, नरवडेने गणेशवर चार गोळ्या झाडत त्याचा खून केला. त्यानंतर, पळून न जाता त्याने गणेशच्या पे्रयसीवर बलात्कार केला. या प्रकारानंतर घटनास्थळी कोणताच पुरावा न ठेवता तो पळून गेला. मात्र, गणेशच्या प्रेयसीने केलेल्या वर्णनावरून त्याचे रेखाचित्र काढण्यात आले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी तीन पथके तयार केली होती. त्यातील ठाणे ग्रामीण गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने, या प्रकरणाचा तपास करत उल्हासनगरमधून संजय नरवडे या रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. तो एका हॉटेलमध्ये लपून बसला होता. संजय यानेच जास्त पैसे मिळविण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबला होता. पैशांसाठीच त्याने गणेश आणि त्याच्या प्रेयसीकडून पैशांची मागणी केली होती. मात्र, त्यांनी विरोध केल्यानेच गणेशला मारावे लागल्याचे त्याने सांगितले, तसेच त्या तरुणीवर बलात्कार केल्याचेही त्याने कबूल केले.


असा केला तपास

या प्रकरणाचा तपास करणाºया पोलीस पथकाने आधी अंबरनाथ पट्ट्यातील अंमली पदार्थ सेवन करणाºयांचा शोध घेतला. ज्या पद्धतीने चोरी, हत्या व बलात्कार करण्यात आला, त्यावरून हे काम सराईत गुन्हेगाराचे किंवा अमली पदार्थांचे सेवन करणाºयाचे असू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे सर्व गर्दुल्ल्यांकडे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली, तसेच त्यांच्यापैकी कोणाकडे रिव्हॉल्व्हर आहे का, याचा तपासही पोलिसांनी केला होता. त्याच वेळी शस्त्राचा धाक दाखवत, चोरी करणाºया संभाव्य चोरट्यांची माहितीही पोलिसांनी काढली होती. त्या आधारावर या आरोपीला अटक झाल्याचे समोर येत आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपीचा शोध नेमका कसा लागला, याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही.

Web Title:  The murder of the accused in the murder, rape case, and the role done by the autorickshaw driver for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.