मुंबईत कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 05:58 AM2018-09-01T05:58:34+5:302018-09-01T06:28:51+5:30

अग्निशमन दलाकडून टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सकाळी 6 वाजेपर्यंतही आग आटोक्यात आली नव्हती.

In Mumbai a dozen vehicles from the fire, fire brigade | मुंबईत कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्या दाखल

मुंबईत कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्या दाखल

Next

मीरारोड (ठाणे) - भाईंदरच्या उड्डाणपुलाजवळील एका प्लॅस्टिक शीट बनवणाऱ्या कंपनीस मोठी आग लागली आहे. आज (शनिवार) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीचे वृत्त समजताच मीरा भाईंदर महापालिकेतील सुमारे डझनभर अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

अग्निशमन दलाकडून टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सकाळी 6 वाजेपर्यंतही आग आटोक्यात आली नव्हती. आग मोठी असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.  काही वर्षांपूर्वी बाजूच्याच अल कॅन या कंपनीला अशीच भीषण आग लागली होती. दरम्यान, आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पाहा व्हिडिओ - 

Web Title: In Mumbai a dozen vehicles from the fire, fire brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.