कल्याणामध्ये मनसेचे फेरीवाल्यांविरोधात आंदोलन, एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर दिला होता इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 03:09 PM2017-10-21T15:09:55+5:302017-10-21T18:04:25+5:30

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर राजसाहेब ठाकरे  यांनी मोर्चा काढून रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती.

MNS protest against hawkers, alerted after Elphinstone disaster | कल्याणामध्ये मनसेचे फेरीवाल्यांविरोधात आंदोलन, एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर दिला होता इशारा

कल्याणामध्ये मनसेचे फेरीवाल्यांविरोधात आंदोलन, एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर दिला होता इशारा

Next

कल्याण - एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा काढून रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती.  ही डेडलाइन संपल्याने  कल्याण मनसे  कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी मनसे स्टाईलने परिसर मोकळा केला. यावेळी रेल्वे प्रशासन व पालिका प्रशासनाला ठणकावूनदेखील सांगितले.

 20 ऑक्टोबरला मनसेनं दिलेली  मुदत संपली.  तरीही  कल्याणात फेरीवल्यांवर कारवाई करत नसल्याने शनिवारी सकाळी कल्याण पश्चिमेतील दीपक हॉटेल ते रेल्वे स्टेशन परिसरातील  फेरीवाल्यांच्या सामानाची व वस्तूंची तोडफोड केली. मनसेचे कौस्तुभ किशोर देसाई कल्याण शहर अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश भोईर , उल्हास भोईर , अमित जतीन, इत्यादी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Web Title: MNS protest against hawkers, alerted after Elphinstone disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.