धक्कादायक! मुंब्रा येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 12:37 IST2018-09-17T12:12:12+5:302018-09-17T12:37:33+5:30

मुंब्रा येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

lover attacked on girl with a knife in mumbra | धक्कादायक! मुंब्रा येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला 

धक्कादायक! मुंब्रा येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला 

ठाणे : मुंब्रा येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून कळव्यातील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

लग्न करण्यास नकार दिला म्हणून मुंब्रा येथील सम्राट नगर परिसरात रविवारी (16 सप्टेंबर) सायंकाळी करण सायवन्ना याने त्याची नातेवाईक असलेल्या तरुणीवर चाकुने वार केले. कळव्यातील छत्रपती महाराज रुग्णालयात तरुणीला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ला केल्यानंतर करण पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 

Web Title: lover attacked on girl with a knife in mumbra