दारूच्या दुकानांची रोकड लुटणारे गजाआड, सहा दरोडेखोरांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 03:12 AM2018-11-10T03:12:05+5:302018-11-10T03:12:51+5:30

कल्याण आणि उल्हासनगर परिसरातील वाइन शॉप्सची कॅश गोळा करणाऱ्या कर्मचाºयांना अडवून त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील रोकड लंपास करणाºया सहा सराईत गुन्हेगारांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे.

Liquor robbers of liquor shops, six robbers arrested | दारूच्या दुकानांची रोकड लुटणारे गजाआड, सहा दरोडेखोरांना अटक

दारूच्या दुकानांची रोकड लुटणारे गजाआड, सहा दरोडेखोरांना अटक

Next

कल्याण : कल्याण आणि उल्हासनगर परिसरातील वाइन शॉप्सची कॅश गोळा करणाऱ्या कर्मचाºयांना अडवून त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील रोकड लंपास करणाºया सहा सराईत गुन्हेगारांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. हरेषकुमार गोस्वामी, गणेश सोनवणे व त्यांच्या अन्य चौघा साथीदारांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाइन्स एजन्सीचे कॅशिअर वाइन शॉप्स आणि वाइन बारकडून रोख रकमेची वसुली करून त्यांच्या मुख्य कार्यालयात परतत असताना त्यांच्यावर पाळत ठेवून रात्रीच्या अंधारात त्यांना अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम हिसकावून पलायन करण्याची कार्यपद्धती आरोपींनी अवलंबिली होती. कल्याण आणि उल्हासनगरमध्ये हे वाढते गुन्हे पाहता ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या गुन्ह्यांना आळा घालून ते उघडकीस आणण्यासाठी कल्याण गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष शेवाळे, पवन ठाकूर, नितीन मुदगुन, नीलेश पाटील आदी पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांनी कसोशीने केलेल्या तपासात सहा आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले.
दरोडेखोरांच्या या टोळीने जानेवारीमध्ये राजा वाइन्स आणि आॅक्टोबरमध्ये महेक वाइन्सच्या डिस्ट्रीब्युटर कंपनीच्या एजंटला लुबाडले होते. त्याच्याकडून साडेसहा लाखांची रोकड लंपास केली होती. हे दोन्ही गुन्हे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहेत, अशी माहिती जॉन यांनी दिली.

तीन दुचाकी जप्त

आरोपींवर हत्या आणि अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात त्यांनी वापरलेल्या तीन दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. आरोपी उल्हासनगर, आंबिवली परिसरातील राहणारे आहेत. आरोपींनी अवलंबिलेल्या कार्यप्रणालीचा बारकाईने अभ्यास करून तांत्रिक व गोपनीय माहितीचे संकलन करून आरोपींना अटक केल्याचे जॉन म्हणाले.

Web Title: Liquor robbers of liquor shops, six robbers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.