नेत्याच्या हट्टापायी सीएमचा जीव धोक्यात;अडथळा आल्याच्या वृत्ताला संबंधित विभागाचा दुजोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 05:06 AM2018-01-13T05:06:56+5:302018-01-13T05:07:08+5:30

मीरा रोड येथे कार्यक्रमाला येताना मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरवताना इंटरनेटच्या केबल आडव्या आल्याने अडचण झाल्याच्या घटनेला राज्याच्या विमान चलन विभागाच्या संचालकांनीच दुजोरा दिला आहे. मात्र असा काही प्रकारच झाला नसल्याची सारवासारव करणारे जिल्हा व पोलीस प्रशासन उघडे पडले आहे.

Leader of the Opposition threatens the life of CM; | नेत्याच्या हट्टापायी सीएमचा जीव धोक्यात;अडथळा आल्याच्या वृत्ताला संबंधित विभागाचा दुजोरा

नेत्याच्या हट्टापायी सीएमचा जीव धोक्यात;अडथळा आल्याच्या वृत्ताला संबंधित विभागाचा दुजोरा

Next

मीरा रोड : मीरा रोड येथे कार्यक्रमाला येताना मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरवताना इंटरनेटच्या केबल आडव्या आल्याने अडचण झाल्याच्या घटनेला राज्याच्या विमान चलन विभागाच्या संचालकांनीच दुजोरा दिला आहे. मात्र असा काही प्रकारच झाला नसल्याची सारवासारव करणारे जिल्हा व पोलीस प्रशासन उघडे पडले आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या स्थानिक नेत्याच्या हट्टाखातर प्रशासनाने हेलिपॅडसाठी सुरक्षित असलेल्या सुभाषचंद्र बोस मैदानाचा पर्याय सोडून शाळेच्या मैदानाची निवड करून मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांचा जीव धोक्यात घातल्याने तोही चर्चेचा विषय बनला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विविध कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम गुरूवारी मीरा रोडच्या एस. के. स्टोन येथील मैदानात ठेवला होता. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अन्य मंत्री, खासदार, आमदार आदी उपस्थित होते. मुंबईचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री व गडकरी हे हेलिकॉप्टरने मीरा रोड येथे येणार असल्याने भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेच्या आवारातील मैदानात हेलिपॅड उभारण्यात आले होते. दुपारी हेलिकॉप्टर उतरवताना वैमानिकाला इमारतीवरून गेलेली इंटरनेटची केबल आडवी आल्याने अडचण झाली. वैमानिकाने प्रसंगावधान राखत ते उतरवले. त्याची चर्चा झाल्यावर ‘अशी काही घटनाच घडली नाही. हेलिकॉप्टर सुखरूप खाली उतरले,’ अशी सारवासारव भाजपाच्या काही नेत्यांसह जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी केली. परंतु विमान चलन विभागाचे संचालक कॅप्टन संजय कर्वे यांनी मात्र हेलिकॉप्टरच्या महिला वैमानिकेने केबल दिसत असल्याने हेलिकॉप्टर उतरवण्यास अडचण झाल्याचे कळवल्याचे स्पष्ट केले. शिवाय वैमानिकाने मुख्यमंत्री व संबंधितांना घेऊन माघारीचे उड्डाण करणार नाही, असे सांगितल्याचे कर्वे म्हणाले. त्यामुळे हेलिकॉप्टर मुख्यमंत्री, गडकरी यांना न घेताच परतले आणि सर्व वाहनाने मुंबईला रवाना झाले.
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या १० जानेवारीच्या पत्राचा संदर्भ देऊन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिलेल्या सेव्हन स्क्वेअर शाळेच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरवणे व उड्डाण करण्यास परवानगी दिली होती. त्यांनी हवामान खाते व विमान चलन संचालकांच्या प्रमाणपत्राचाही हवाला दिला होता.
वास्तविक मुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्वाच्या व्यक्ती हेलिकॉप्टरने येणार म्हणून हेलिपॅडची जागा निवडताना अतिशय खबरदारी घेणे आवश्यक होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने सेव्हन स्क्वेअर शाळेच्या आवारातील मैदानात परवानगी देताना आजूबाजूला असलेल्या उंच इमारती, त्यावरुन गेलेल्या केबल यांचा विचार का केला नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम खात्यासह संबंधित यंत्रणांनी देखील यात दुर्लक्ष केल्याचे सकृतदर्शनी नाकारता येत नाही.
मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर आपल्या शाळेच्या मैदानात उतरवण्याचा आग्रह भाजपाच्या स्थानिक नेत्याने धरला होता. हेलिपॅडची जागा ही पक्षाचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहतांसोबत झालेल्या चर्चेनुसार ठरवण्यात आली होती असे महामार्ग प्राधिकरणासह अन्य विभागाच्या सूत्रांनी देखील म्हटले आहे. वास्तविक भार्इंदर पश्चिमेला असलेल्या सुभाषचंद्र बोस मैदानाचा पर्याय हेलिपॅडसाठी अत्यंत सुरक्षित होता. कारण या परिसरात एकही इमारत नसून केबलच्या वायर गेलेल्या नाहीत. आजूबाजूला कांंदळवन व मीठागर आहे. या मैदानात हेलिपॅड उभारले जाते. शिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणापासून बोस मैदान जवळच आहे.

सूत्रे नेत्याच्याच हाती
महामार्ग प्राधिकरणाचा कार्यक्रम असला, तरी त्याची सूत्रे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनीच हाताळली, असे चित्र होते. मुख्यमंत्री, गडकरी हेलिकॉप्टरने उतरले तेव्हा नेत्यांनी सहकुटुंब त्यांचे स्वागत केले.
सर्वांचा पाहुणचारही तेथेच झाला. याबाबत आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

Web Title: Leader of the Opposition threatens the life of CM;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.