वर्तकनगर, नौपाड्यात घरांत चिखल, नालेसफाईत नियोजनाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:17 AM2019-06-12T00:17:45+5:302019-06-12T00:18:23+5:30

पहिल्याच पावसात १३ ठिकाणी तुंबले पाणी : नालेसफाईत नियोजनाचा अभाव

Lack of planning in Varanak Nagar, Nawada mud mud, Nalsafai | वर्तकनगर, नौपाड्यात घरांत चिखल, नालेसफाईत नियोजनाचा अभाव

वर्तकनगर, नौपाड्यात घरांत चिखल, नालेसफाईत नियोजनाचा अभाव

Next

ठाणे : सोमवारी रात्री एक तासाच्या पावसाने ठाणेकरांची पुरती दैना उडाली. दुसरीकडे पालिकेने केलेल्या कामांची पोलखोलही यावेळी झाली. पहिल्या पावसाताच वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतीमध्ये नाल्याचे घाण पाणी आणि गाळ घरात घुसल्याने नागरिकांना रात्रभर हा गाळ उपसावा लागला. मंगळवारी सकाळी म्हाडा वसाहतीच्या बाहेर रस्त्यावर तो तसाच पडून होता. चिखलवाडी परिसरातही

नालेसफाईमध्ये बाहेर काढलेला गाळ घरात शिरला. शहरात तब्बल १३ ठिकाणी एका तासाच्या पावसामुळे गुडघाभर पाणी साचले होते.
वर्तकनगर येथील जुन्या आणि नव्या म्हाडा वसाहतीमध्ये अक्षरश: नाल्याचे घाण पाणी शिरले होते. ऐन रात्रीमध्ये हा सर्व प्रकार घडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. संपूर्ण रस्त्यावर अक्षरश: गाळाचे आणि घाण पाणी साचले होते. नागरिकांच्या तक्र ारी नंतर रात्री उशिरा पालिका कर्मचाऱ्यांनी गाळ काढण्याचे काम सुरू केले. स्वत: सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. येथील नाल्याची सफाई अजूनही झाली नसून कचरा अजूनही नाल्यात पडून आहे. तर नाल्याच्या एका बाजूला नाल्यातच गाळ साठवून ठेवल्याने पाण्याचा प्रवाह अडून पाणीघरात शिरले, असा आरोप नागरिकांनी केला. या परिसरातील संतोष निकम यांच्या म्हणण्यानुसार नाल्यात तीन ठिकाणी एकाच वेळी कल्व्हर्ट काम सुरू केले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार झाला. याशिवाय नाल्यातील गाळदेखील काढला नसल्याने हे सर्व पाणी नागरिकांच्या घरात शिरले. वर्तकनगरच्या विकासासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली जाते. मात्र, नालेसफाईमध्येच सर्व कारभाराचा बोजवारा उडाला आहे. पंडित यांनी सर्व यंत्रणांना स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. नाल्यात जेसीबी घुसवण्यासाठी मातीचा रॅम्प तयार केला होता. तो गाळ नव्हता. त्यामुळेदेखील पाणी अडून ते पाणी रस्त्यावर आले असल्याचे त्यांनी सांगितले.

चिखलवाडीत ५0 घरांत पाणी
दुसरीकडे नौपाडा भागातील चिखलवाडी परिसरातही नाल्याचे घाण पाणी सुमारे ५० हून अधिक नागरिकांच्या घरात शिरले.त्यामुळे या परिसरात संपूर्ण दुर्गंधी पसरली आहे.

त्यामुळे नागरिकांच्या सामानाचेदेखील नुकसान झाले. प्रत्येक पावसात या ठिकाणी पाणी साचते. मात्र, सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात पाणी रस्त्यावर आणि घरात शिरले.

झोपपडट्टीचा भाग असल्याने पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना प्रादुर्भाव होण्याची चिन्हे आहेत.

अधिकाऱ्यांची कार्यालयात दांडी
पावसात प्रत्येक अधिकाºयाने प्रभाग समितीमध्ये राहण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मान्सूनपूर्व बैठकीमध्ये दिले होते. मात्र, आयुक्तांची पाठ फिरताच फारच कमी अधिकारी सोमवारी रात्री प्रभाग समिती कार्यालयात उपस्थित होते. केवळ अधिकाºयांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर माहितीची देवाणघेवाण सुरू होती. आयुक्त स्वत: व्हॉट्सअपवर परिस्थितीचा आढावा घेत होते. जे अधिकारी प्रत्यक्ष प्रभाग समितीमध्ये उपस्थित नव्हते त्यांची नावे आयुक्तांना कळवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयाने
स्पष्ट केले.

Web Title: Lack of planning in Varanak Nagar, Nawada mud mud, Nalsafai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.