कोलशेतमध्ये भूमिपुत्रांवर अन्याय, उपऱ्यांना पायघड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 01:39 AM2019-06-23T01:39:39+5:302019-06-23T01:40:01+5:30

देशाच्या सुरक्षेसाठी झटणा-या नौदल आणि वायुसेनेच्या सोयीसाठी कोलशेतवासीयांनी कधीकाळी उदार मन केले. या सशस्त्र सेनांचे हात बळकट व्हावे, यासाठी त्यांनी स्वत:च्या जमिनींवर कोणताही मोबदला न घेता पाणी सोडले.

In Kolshat, injustice with the local people | कोलशेतमध्ये भूमिपुत्रांवर अन्याय, उपऱ्यांना पायघड्या

कोलशेतमध्ये भूमिपुत्रांवर अन्याय, उपऱ्यांना पायघड्या

Next

- अजित मांडके  

देशाच्या सुरक्षेसाठी झटणाºया नौदल आणि वायुसेनेच्या सोयीसाठी कोलशेतवासीयांनी कधीकाळी उदार मन केले. या सशस्त्र सेनांचे हात बळकट व्हावे, यासाठी त्यांनी स्वत:च्या जमिनींवर कोणताही मोबदला न घेता पाणी सोडले. त्या जमिनींवरच आज या सशस्त्र सेनांचे तळ उभे राहू शकले. येणाºया काही वर्षांत याच यंत्रणा आपल्याला गावातून हद्दपार करतील, याची पुसटशीही कल्पना त्यावेळी गावकऱ्यांना नव्हती. जवळपास ५0 वर्षे उलटल्यानंतर आता गावकºयांना आपला निर्णय चुकल्यासारखे वाटत आहे. या काळात गावाची लोकसंख्या वाढली. गावकºयांची कुटुंबे वाढली आणि त्याबरोबरच आपली घरे त्यांना अपुरी पडू लागली. आता या घरांचे बांधकाम करायचे झाल्यास, नौदल आणि वायुसेनेकडून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यांचा हा मुद्दा गावकरी समजून घ्यायला आहेत; पण याच भागात तीसतीस मजली गगनचुंबी इमारती विनासायास उभ्या होताना दिसल्या की, गावकºयांमध्ये अन्यायाची भावना प्रबळ होते. स्थानिक रहिवाशांनी घरावर एक मजला चढवायचा म्हटले की, सुरक्षा यंत्रणांना धोका वाटतो आणि बाहेरून आलेल्या धनदांडग्या विकासकांनी आकाशाला भिडणाºया इमारती उभ्या केल्या तरी चालतात, असे का. स्थानिकांनाच आडकाठी का, असे अनेक प्रश्न कोलशेतच्या रहिवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.

सुमारे ५० ते ५५ वर्षांपूर्वी आपल्या शेतीच्या, बागेच्या किंवा इतर वापराच्या जमिनी कोणत्याही मोबदल्याशिवाय नेव्ही आणि एअरफोर्ससाठी देणाºया कोलशेत गावातील रहिवाशांना आता हद्दपार होण्याची भीती सतावत आहे. विकासकांकडून उभारल्या जाणाºया इमल्यांवरून हल्ला होण्याची एअरफोर्सच्या मंडळीना भीती वाटत नाही; मात्र गावातील रहिवाशांनी घर दुरुस्तीसाठी काढले किंवा एक मजला वाढवण्याचा प्रयत्न जरी केला, तरी आम्हाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी ओरड या मंडळींकडून केली जाते. अशातच एअरफोर्सच्या हद्दीपासून जवळ असलेल्या याच गाववाल्यांना आता इतरत्र हलवण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ज्यांना आम्ही कसत असलेल्या जमिनी दिल्या, त्यांनाच आता आम्ही नकोसे का झालो आहोत, असा सवाल आता हे गावकरी करू लागले आहेत.
कोलशेत आणि आजूबाजूच्या गावाला ३५० वर्षांचा इतिहास आहे. हा इतिहास येथील मरिआईदेवीच्या मंदिराकडे पाहिल्यास सहज डोळ्यांसमोर उभा राहतो. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी खोदकाम करताना ३०० ते ३५० वर्षांपूर्वीची नाणी आढळली. त्यामुळे एअरफोर्स वसण्याआधी आमचे गाव येथे होते, असे येथील लोक सांगतात. या गावाची आजची लोकसंख्या १५ हजारांच्या आसपास आहे. तरीचापाडा, कोलशेत वरचा गाव, कोलशेत खालचा गाव, मरिआईनगर अशी काही गावे आहेत. सुरुवातीपासूनच या गावाच्या विकासाच्या आड अनेक मुद्दे आले. केमिकल झोन, बफर झोन, सीआरझेड, कोस्टल झोनच्या विळख्यात गाव अडकले आहे. त्यामुळे या गावाचा हवा तसा विकास आजही झालेला दिसत नाही. काही टूमदार घरे असली, तरी त्यांची दुरुस्ती करण्याची वेळ आता आली आहे. ५०० ते ६०० लोकवस्ती असलेले हे गाव आज १५ हजारांच्या लोकवस्तीचे झाले आहे. असे असताना या गावाचा विकास तर सोडाच, येथील गावकºयांना स्वत:च्याच जागेतून हद्दपार होण्याची वेळ आली आहे.
५० ते ५५ वर्षांपूर्वी येथे नेव्ही आणि एअरफोर्ससाठी येथील जागा देण्यात आली. त्यावेळी येथील रहिवासी जमीन कसत होते. काहींच्या फळबागा, शेती अशी पिके देणाºया जमिनी होत्या. परंतु, त्यावेळी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता, या जमिनी नेव्ही आणि एअरफोर्ससाठी देण्यात आल्या. आधी आमच्या जागांवर कोणताही मोबदला दिल्याशिवाय नांगर फिरवण्यात आला. आता आमच्यापासूनच एअरफोर्सवाल्यांना धोका झाल्याचे सांगितले जात आहे. आम्ही जागा दिल्यानंतरही आता आमच्यावरच बेघर होण्याची वेळ आली आहे. मागील कित्येक पिढ्या या गावाने पाहिल्या आहेत. परंतु, आता एअरफोर्सपासून २० ते ३० फुटांपर्यंतच्या रहिवाशांना दुसरीकडे वास्तव्य करण्यासाठी सांगितले जात आहे. त्यासाठी भिवंडीची निवड केली आहे. परंतु, मागील कित्येक वर्षे आम्ही येथे वास्तव्यास आहोत. आमची नाळ या मातीशी जोडली गेलेली आहे. असे असताना आता आमच्याच मुळावर ही मंडळी का उठली, असा सवाल गावकरी करू लागले आहेत. तुम्हाला जर आम्हाला येथून हलवायचेच होते, तर जेव्हा आम्ही आमच्या जागा दिल्या, तेव्हाच आम्हाला येथून हलवले असते तर चालले असते. त्यावेळी येथील लोकसंख्याही कमी होती. सिंधी लोकांची वस्तीसुद्धा येथे होती. परंतु, त्यांना येथून कोपरीत हलवण्यात आले. त्याचवेळी ही पावले उचलली असती, तर आज हा प्रश्न उभा राहिला नसता, असे गावकºयांचे म्हणणे आहे. आज एवढ्या वर्षांनंतर आमच्यावरच अन्याय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आज गावकºयांकडे स्वत:च्या जमिनी शिल्लक नाहीत, मच्छीमारी व रेती व्यवसाय बंद झाला आहे. त्यामुळे गावातील रहिवाशांच्या हाताला काम राहिलेले नाही. त्यात नवीन पिढी तयार होत असताना, कुटुंबे वाढत असताना, घर दुरुस्ती करायला घेतली की, तीही या मंडळींना नकोशी झाली आहे. घरातील सदस्यसंख्या वाढल्याने तळ अधिक एक मजल्याचे काम करायचे ठरवले, तरी त्यासाठीही नकारघंटा वाजवली जाते. त्यामुळे आम्ही करायचे कसे, राहायचे कसे, असे अनेक प्रश्न या गावकºयांना सतावू लागले आहेत.
एकीकडे आमच्या घरांचा एक मजला वाढवला, तर आम्हाला धोका निर्माण होऊ शकतो, असे एअरफोर्सकडून सांगितले जाते. मात्र, १०० मीटरच्या अंतरावर रहिवास क्षेत्र नसावे, असे नियमात असतानाही २५ ते ३० माळ्यांचे विकासकांचे इमले यांना कसे काय चालतात. त्या घरांमध्ये वास्तव्यास येणाºया मंडळींनाही लोक ओळखतात का, आम्ही तर गावकरी आहोत, त्यामुळे आम्ही अधिक परिचयाचे आहोत, असे असताना आमच्यावरच अन्याय का, असेही येथील रहिवासी बोलत आहेत.

येथील लोकसंख्या वाढली आहे, कुटुंबे वाढली आहेत, त्यामुळे रहिवाशांना घरांची दुरुस्ती करायची आहे, नियमानुसार ती करताही येऊ शकते. परंतु, एअरफोर्सकडून आडकाठी आणली जात आहे, ती कशासाठी? आधीच रहिवाशांच्या हातातून अनेक व्यवसाय गेले. विविध झोनमुळे विकास खुंटला. असे असताना आता पुन्हा ही आडकाठी अयोग्य आहे.
- मधुकर पावशे, नगरसेवक तथा स्थानिक रहिवासी

एअरफोर्सला विकासकांचे इमले चालतात आणि आम्ही एक मजला वाढवण्यासाठी विनंती केली, तर आमच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका घेतली जाते. आमच्यापासून धोका आहे की, त्या विकासकांच्या गगनचुंबी इमारतींचा धोका आहे, हे स्पष्ट झालेच पाहिजे.
- संजय पाटील, स्थानिक नागरिक, कोलशेत

नियमात बसेल त्यांनाच परवानगी दिलेली आहे. विकासकांनी संबंधित यंत्रणेकडून नाहरकत दाखला आणला असेल, तरच पालिकेकडून परवानगी दिली जात आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा

आमचे ठाण्यात विविध ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत. आम्हाला त्यासाठी ज्याज्या परवानग्या लागतात, त्या आम्ही ठाणे महापालिकेकडून घेतल्या आहे. सर्व प्रकल्पांची कामे नियमानुसारच सुरू आहेत.
- गौरव सारडा, उपाध्यक्ष, मार्केटिंग, लोढा ग्रुप

वास्तविक पाहता, येथील भूमिपुत्रांवर हा अन्याय आहे. एकीकडे येथे २५ ते ३० मजल्यांचे इमले उभे राहत आहेत. त्यांच्यापासून एअरफोर्सवाल्यांना भीती वाटत नाही. मात्र, ग्रामस्थांनी घरे दुरुस्त करताना अथवा एक मजला वाढवला, तर त्यापासून या मंडळींना धोका संभवतो, हे म्हणजे हास्यास्पदच आहे. त्यात पालिकेची भूमिकाही अयोग्य वाटत आहे. त्यांनी येथील विकासकांना परवानग्या दिल्या कशा, हासुद्धा एक संशोधनाचाच विषय आहे. - मिलिंद पाटील,
विरोधी पक्षनेते, ठाणे महापालिका

कोलशेत गावातील स्थानिक भूमिपुत्रांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांना साधी घरे दुरुस्त करण्यासाठीही परवानगी दिली जात नाही. हा त्यांच्यावरील मोठा अन्याय आहे, त्यामुळे आम्ही खासदार विनय सहस्रबुद्धे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. यावर काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. - मनोहर डुंबरे, स्थानिक नगरसेवक
 

Web Title: In Kolshat, injustice with the local people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे