केडीएमसी पोटनिवडणूक: उमेदवारी अर्जासाठी आज अखेरचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:50 AM2019-06-06T00:50:21+5:302019-06-06T00:50:45+5:30

पोटनिवडणूक : सेना, काँग्रेसमध्ये लढत

KDMC Bye Election: The last day for the candidature of the candidate today | केडीएमसी पोटनिवडणूक: उमेदवारी अर्जासाठी आज अखेरचा दिवस

केडीएमसी पोटनिवडणूक: उमेदवारी अर्जासाठी आज अखेरचा दिवस

Next

कल्याण : केडीएमसीच्या रामबाग खडक प्रभागात लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत शिवसेना आणि काँग्रेस ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचा निर्णय कोअर कमिटीवर अवलंबून आहे. दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात कोणकोण असेल, याचे चित्र गुरुवारी समोर येईल.

रामबाग खडक प्रभागाच्या शिवसेनेच्या नगरसेविका वैजयंती गुजर-घोलप यांनी सादर केलेले जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. नगरसेवकपद रिक्त झाल्याने या प्रभागात २३ जूनला पोटनिवडणूक होत आहे. ३० मेपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून अंतिम दिवस गुरुवारी आहे. पण, अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे गुरुवारी अखेरच्या दिवशी कोणकोण उमेदवारी अर्ज दाखल करतो, याकडे लक्ष लागले आहे. गुरुवारी सेनेचा उमेदवार अर्ज दाखल करणार आहे. या उमेदवाराचे नाव शिवसेनेने उघड केलेले नाही. काँग्रेसतर्फे ओबीसी सेलचे कल्याण शहर जिल्हाध्यक्ष रवींद्र परटोले हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली. दरम्यान, मनसे पोटनिवडणूक लढवणार की नाही, याचाही निर्णय उद्याच होणार आहे.

भाजपचा निर्णय गुलदस्त्यात
महापालिकेच्या २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात लढले होते. या निवडणुकीनंतर युती झाली आहे. या पोटनिवडणुकीत युतीचा उमेदवार असेल की, भाजप स्वतंत्र उमेदवार उभा करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासंदर्भात कल्याण पश्चिमचे भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाजपतर्फे उमेदवार उभा करायचा की नाही, याचा निर्णय आमची कोअर कमिटी घेईल, पण अद्याप निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत युती असल्याने पोटनिवडणूक भाजप लढवणार नाही, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

Web Title: KDMC Bye Election: The last day for the candidature of the candidate today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.