कल्याण तीन हत्यांमुळे हादरले, २२ तासांतील घटना, क्षुल्लक कारणांमुळे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 04:47 AM2018-02-04T04:47:49+5:302018-02-04T04:48:01+5:30

क्षुल्लक कारणांमुळे मागील २२ तासांमध्ये घडलेल्या तीन हत्यांमुळे कल्याण शहर हादरून गेले आहे. हत्या झालेल्यांमध्ये दोन तरुण आहेत. या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

Kalyan shook three killings, 22-hour incidents, victimization for minor reasons | कल्याण तीन हत्यांमुळे हादरले, २२ तासांतील घटना, क्षुल्लक कारणांमुळे बळी

कल्याण तीन हत्यांमुळे हादरले, २२ तासांतील घटना, क्षुल्लक कारणांमुळे बळी

googlenewsNext

कल्याण : क्षुल्लक कारणांमुळे मागील २२ तासांमध्ये घडलेल्या तीन हत्यांमुळे कल्याण शहर हादरून गेले आहे. हत्या झालेल्यांमध्ये दोन तरुण आहेत. या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
पश्चिमेतील रामबाग लेन क्रमांक-४ मधील दत्तछाया इमारतीमध्ये राहणारे मनोहर गामने (वय ५४) हे त्यांच्याच परिसरातील प्रभू ब्रदर्स या दुकानात शुक्रवारी अंडी घेण्यासाठी गेले होते. दोन अंडी खरेदी केल्यानंतर दुकानदाराने त्यांच्याकडे ११ रुपये मागितले. मात्र, सर्वत्र दोन अंड्यांची किंमत १० रुपये असताना, तुम्ही एक रुपया जास्त का घेता, असा सवाल गामने यांनी दुकानदाराला विचारला. यावरून दुकानदाराने गामने यांच्याशी हुज्जत घातली. तसेच याच गोष्टीचा जाब विचारण्यासाठी गामने व त्यांचा मुलगा प्रशांत हा रात्री ११ च्या सुमारास प्रभू ब्रदर्स दुकानात गेले. या वेळी दुकानात दुकानदाराचा मुलगा सुधाकर प्रभू बसला होता. गामने पुन्हा दुकानात आल्याचा राग सुधाकरला आला. त्यातून त्याने गामने यांना शिवीगाळ करत रस्त्यावरच ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या गामने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी प्रशांत याने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याआधारे पोलिसांनी सुधाकर प्रभू (रा. संतोषीमाता रोड, कल्याण) याला अटक केली आहे.
दुसरी घटना अटाळी परिसरात घडली आहे. पूर्वीच्या घरगुती वादातून सोनूसिंग करतारसिंग सरदार (२२, रा. शहाड, कल्याण) याची १० जणांनी मिळून धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना रात्री ९ च्या सुमारास घडली. सोनूसिंग आणि आसवान सिंग यांच्यात पूर्ववैमनस्य होते. त्यातून आसवान सिंग, राजेंद्रकौर ऊर्फ बेबी, दीपा कौर, तुफानसिंग, सुरजसिंग, गोबूसिंग, दादूसिंग, जग्गासिंग आणि राजू सिंग (सर्व रा. आंबिवली) यांनी सोनूसिंग याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या सोनूसिंग याला पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या वेळी सोनूसिंगच्या समर्थकांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. सोनूसिंगच्या हत्येप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी आसवान सिंग, दीपा कौर आणि सुरजसिंग यांना अटक केली आहे. तर, उर्वरित फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, डोंबिवली शहरात मे २०१७ मध्ये गोळीबाराच्या तीन घटना घडल्या होत्या. त्यात साधारण तिघांचा मृत्यू झाला होता. क्षुल्लक कारणासाठी हिंसाचार करण्याची प्रवृत्ती अलिकडेच वाढली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील पोलिसांपुढे ती रोखण्याचे मोठे आव्हानच निर्माण झाले आहे. तणावाखाली असलेल्या लोकांना समुपदेशनाची गरज असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

क्रिकेटमधील वाद बेतला जीवावर
कोळसेवाडी परिसरात तिसरी घटना घडली आहे. क्रिकेटच्या वादातून अशोक मालुसरे (३२) याच्यावर त्याच परिसरात राहणाºया तस्लीम शेख आणि लाला ऊर्फ लल्ला यांनी गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला केला.
त्यात गंभीर जखमी झालेल्या अशोक याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी लाला ऊर्फ लल्ला याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.ा राहणाºया तस्लीम शेख आणि लाला ऊर्फ लल्ला यांनी गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला केला.

Web Title: Kalyan shook three killings, 22-hour incidents, victimization for minor reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून