ठाण्यात बंगलो प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सव्वा कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 10:12 PM2018-08-21T22:12:43+5:302018-08-21T22:18:44+5:30

बंगलो प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास दहा बंगले आणि चांगला नफा देण्याची बतावणी करून ठाण्यातील कोलशेत येथील एका व्यवसायिकाला एक कोटी २० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Investments in the project in Thane in Thane show millions of crores of rupees | ठाण्यात बंगलो प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सव्वा कोटींचा गंडा

ठाण्याच्या नौपाडयातील घटना

Next
ठळक मुद्देठाण्याच्या नौपाडयातील घटनाकल्याण मुरबाड रोडवरील प्रोजेक्टदोन महिला संचालकांविरुद्ध गुन्हा

ठाणे :  कल्याण मुरबाड रोडवरील बंगलो प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास दहा बंगले आणि चांगला नफा देण्याची बतावणी करून ठाण्यातील कोलशेत येथील एका व्यवसायिकाला एक कोटी २० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सेटर्न ब्ल्यू रिआलिटी प्रा. लि. या कंपनीच्या दोघा महिला संचालिकांविरोधात सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या दोघा महिलांनी अशाच प्रकारे अन्य दोघांचीदेखील १२ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोलशेत येथील द्विंकल टॉवरमध्ये राहणारे दीपक कतीरा (४९) या व्यवसायिकाची राम मारूती रोडवरील सेटर्न ब्ल्यू रिआलिटी प्रा. लि या कंपनीच्या संचालिका योगिता अभिजित सावरतकर (३३) आणि छाया प्रकाश माने (५८) यांच्याशी जून २०१५ मध्ये ओळख झाली होती. या दोघींनी कतीरा यांना मुरबाड येथील एका बंगल्याच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास १० बंगले आणि गुंतवणुकीवर नफा देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार कतीरा यांनी जून २०१५ ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत एकूण एक कोटी २० लाख रु पये दोघींना वेळोवेळी गुंतवणुकीसाठी दिले. मात्र या तथाकथित कंपनीच्या दोघा संचालिकांनी प्रोजेक्ट सुरूच केला नाही. गुंतवणूक केलेली रक्कमदेखील परत न करता कतीरा यांची फसवणूक केली. दरम्यान, दोघींनी अशाच प्रकारे मुस्तफा विकरअली मसालावाला यांच्याकडून ११ लाख ५० हजार रु पये आणि प्रशांत तेलंग यांच्याकडून दोन लाख रु पये गुंतवणुकीच्या नावावर घेऊन त्यांचीदेखील फसवणूक केली असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. याप्रकरणी दीपक कतीरा यांनी दिलेल्या तक्र ारीनंतर नौपाडा पोलिसांनी सेटर्न ब्ल्यू रियालिटी प्रा. लि. या कंपनीच्या संचालिका योगिता सावरतकर आणि छाया माने यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Investments in the project in Thane in Thane show millions of crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.