भारताची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार; ‘नोटाबंदी’तून होत आहे आगेकूच - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 03:59 AM2017-11-09T03:59:38+5:302017-11-09T04:01:09+5:30

काही नोटा चलनातून बाद करणे, एवढाच नोटाबंदीचा उद्देश नव्हता. नोटाबंदी हे जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताने टाकलेले एक पाऊल आहे.

India will be the world's largest economy; 'Nomination' is happening ahead - Chief Minister | भारताची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार; ‘नोटाबंदी’तून होत आहे आगेकूच - मुख्यमंत्री

भारताची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार; ‘नोटाबंदी’तून होत आहे आगेकूच - मुख्यमंत्री

Next

ठाणे : काही नोटा चलनातून बाद करणे, एवढाच नोटाबंदीचा उद्देश नव्हता. नोटाबंदी हे जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताने टाकलेले एक पाऊल आहे. या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेची गती वाढत असून लवकरच भारताची अर्थव्यवस्था जगभरात सर्वाधिक सक्षम राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ठाण्यात केले.
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या आॅलिम्पस सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन हे प्रामुख्याने उपस्थित होते.
डिजिटलायझेशनच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या टीसीएसच्या आॅलिम्पस सेंटरचे उद्घाटन आणि नोटाबंदीची वर्षपूर्ती योगायोगाने एकाच दिवशी असून याकडे मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचा कांगावा विरोधक करत आहेत. त्यांचा समाचार मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला.

तरुणांसाठी कटिबद्ध -
राज्यातील बुद्धिमान तरुणांची तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगती व्हावी, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी सांगितले. टीसीएसचा प्रवास मुंबईतूनच सुरू झाला. टीसीएसची ठाण्यातील इमारत अवघ्या दीड वर्षात उभारल्याचे गोपीनाथन यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाला महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गणपत गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परमबिरसिंग, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

नोटाबंदीसह जीएसटीविरोधात शिवसेनेचा हल्लाबोल! -
नोटबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी)मुळे देशाची अर्थ व्यवस्था खिळखिळी झाली आहे. संघटित व असंघटित कामगारांसह व्यापारी वर्गावरही आत्महत्येची वेळ आल्याची टीका करत राज्यात सत्तेत सलेल्या शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेने बुधवारी आझाद मैदानात निदर्शने केली. यावेळी समाजवादी पार्टीनेही काळ््या फिती लावत निदर्शने केली.

शिव व्यापारी सेनेचे अध्यक्ष चिंटू शेख यांनी आझाद मैदानात निषेध सभा घेत भाजपाविरोधात जोरदार टीका केली. शेख म्हणाले की, नोटबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. तर जीएसटीने उरले-सुरलेले लघुउद्योगही बंद केले आहेत. अद्याप व्यापाºयांना जीएसटी कळालेला नसून सीए वर्गाकडून सर्रासपणे लूट सुरू आहे. त्यामुळे नोटबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीत सरकार अपयशी ठरले आहे.

समाजवादी पार्टीने काळ््या फिती लावून नोटबंदीच्या वर्षपूूर्तीचा निषेध व्यक्त केला. मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे आर्थिक क्षेत्राची जणू नसबंदी झाल्याची टीका सपाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शब्बीर अहमद मजाहीरी यांनी केली. ते म्हणाले की, नोटबंदीचा फटका सर्वसामान्यांनाच बसला. रोजंदारीने काम करणाºया अनेकांना त्यांचा रोजगार गमवावा लागला असून व्यापाºयांचे धंदे उध्वस्त झाले आहेत. याउलट धनाड्या लोकांनी पैशांचा वापर करून यामधून सफशेल सुटका करून घेतली. म्हणूनच नोटबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून सरकारने केलेल्या घोषणांपैकी एकही उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सरकारने जनतेची माफी मागावी, अशी मागणी सपाने केली.

Web Title: India will be the world's largest economy; 'Nomination' is happening ahead - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.