आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नींच्या हस्ते उल्हासनगरातील विविध विकासकामांची उद्घाटन

By सदानंद नाईक | Published: February 25, 2024 07:44 PM2024-02-25T19:44:26+5:302024-02-25T19:45:21+5:30

त्यावेळी आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

Inauguration of various development works in Ulhasnagar by MLA Ganpat Gaikwad's wife | आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नींच्या हस्ते उल्हासनगरातील विविध विकासकामांची उद्घाटन

आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नींच्या हस्ते उल्हासनगरातील विविध विकासकामांची उद्घाटन

सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-४ परिसरातील विविध विकास कामाचे उदघाटन गोळीबार प्रकरणी जेल मध्ये असलेले आमदार गणपत गायकवाड यांच्या धर्मपत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते रविवारी दुपारी झाले. आमदार गणपत गायकवाड यांच्या धर्मपत्नी प्रथमच घराबाहेर पडल्याने, त्यांच्या विषयी उत्सुकता निर्माण झाली होती.

उल्हासनगर कॅम्प नं-४ मधील काही भाग कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात येत असून मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड आहेत. हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड जेल मध्ये आहेत. त्यांच्या आमदार निधीतील विकास कामाचे भूमिपूजन रखडले होते. अखेर त्यांच्या धर्मपत्नी सुलभा गायकवाड यांनी पुढाकार घेत विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा निर्धार करून, कल्याण पूर्व मतदारसंघातील कॅम्प नं-४ मधील विविध विकास कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

शहरातील कॅम्प नं-४ परिसरातील इसरदास दरबार, श्रीरामनगर येथील गणपती मंदिर परिसर, महादेवनगर चाळ, सत्रामदास हॉस्पिटल आदी ठिकाणच्या ५ कोटीच्या निधीतील विविध विकास कामाचे उदघाटन सुलभा गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा समर्थकांनी देऊन परिसर दणाणून सोडला होता.

Web Title: Inauguration of various development works in Ulhasnagar by MLA Ganpat Gaikwad's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.