पतीने व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज करीत पत्नीला दिला ट्रिपल तलाक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 12:19 AM2019-05-08T00:19:30+5:302019-05-08T00:19:50+5:30

एकीकडे मुस्लिम महिलांना दिलासा मिळावा या करीता ट्रिपल तलाक बंदीसाठी सरकार प्रयत्नशील असतानाच पुन्हा एकदा ट्रिपल तलाकची घटना समोर आली आहे.

Husband announces wife to wife | पतीने व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज करीत पत्नीला दिला ट्रिपल तलाक

पतीने व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज करीत पत्नीला दिला ट्रिपल तलाक

googlenewsNext

भिवंडी - एकीकडे मुस्लिम महिलांना दिलासा मिळावा या करीता ट्रिपल तलाक बंदीसाठी सरकार विधेयक आणून संसदेत कायदा करीत आहे तर दुसरीकडे पतीने हुंड्यासाठी आपल्या पत्नीला चक्क  व्हॉट्स अ‍ॅपवरुन  तलाक तलाक तलाक अशा मेसेजच्या माध्यमातून ट्रिपल तलाक देण्याचा प्रकार समोर आला आहे .या प्रकरणी पीडित महिलेने पोलिस स्थानकात तसेच महिला मंडळात धाव घेतली आहे . पीडित महिलेने पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली  आहे . 

नदीम शेख असे व्हॉट्स अ‍ॅप च्या माध्यमातून तलाक देणा-या पतीचे नाव असून त्याचे पाच वर्षांपूर्वी आरजू शेख या पायाने अधू असणा-या युवती सोबत 2014 साली त्यांचा निकाह झाला होता . त्यांना एक चार वर्षाचा मुलगा ही  आहे . पती नदीम शेख टेक्निकल इंजिनीअर म्हणून कल्याण मध्ये काम करीत आहे. तर पीडित महिला ही पायाने अपंग असून घरकाम करते. अशा परिस्थितीत या महिलेला ट्रिपल तलाक व्हॉट्स अ‍ॅप च्या माध्यमातून देण्यात आल्याने महिलेला धक्का बसला असून पीडितेने पोलिस ठाण्यात तसेच महिला मंडळात धाव घेतली आहे.

पीडित महिला  आरजू शेख  (23)ही  शहरातील दिवनशाहा दर्गा येथील रहाणारी असून  तीचा 18 मे 2014 रोजी नदीम याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून आरजूच्या आई-वडिलांनी जावई नदीम यास 10,051 रुपये रोख व संसारोपयोगी वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या. मात्र लग्नाच्या काही दिवसा नंतर पीडित महिलेचा पती व तिच्या सासरच्या मंडळींनी छळ करायला सुरुवात केली होती. ती पसंद नसल्याचं कारण देत तिला शिवीगाळ करून नेहमी मारझोड करीत होता. त्यासोबतच नदीम हा तिच्या चारित्र्यावर संशय ही घेत होता. मात्र एवढा त्रास सहन केल्यानंतर या पीडित महिलेने पाच वर्ष आपला संसार टिकवून ठेवला होता. नदीम व आरजू यांना एक चार वर्षाचे गोंडस बाळ ही आहे . परंतु मागील काही महिन्यांपासून नदीमने  फ्लैट घेण्यासाठी 10 लाखांची मागणी करण्यास सुरवात केली व ते न देऊ शकल्याने पीडित महिलेला बेदम मारहाण करून तिला घरातून बाहेर काढून देण्यात आले होते.तसेच आरजू हिला व्हाट्सअप वर ट्रिपल तलाक देऊन तलाक झाल्याचं सांगितलं गेलं.

हे शब्द तिने व्हॉटसअप वर पहिल्या नंतर तिच्या पायाखालची वाळू सरकली. यानंतरही पिडीत महिलेने पती नदीम यास संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु नदीम ने आपले तलाक झाले असल्याचे सांगत संपर्क करण्यास टाळू लागला.त्यामुळे  पीडित पत्नीने  न्यायाची अपेक्षा करत पोलीस स्टेशन व महिला मंडळात धाव घेतली आहे.मात्र अजूनही या महिलेची दखल कोणीही घेतली नसून पोलीस ठाण्यात आद्य प  गुन्हा दाखल झाला नाही.

Web Title: Husband announces wife to wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.