‘सिव्हिल’मध्ये तरुणीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 04:16 AM2018-05-19T04:16:11+5:302018-05-19T04:16:11+5:30

ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात चिमुरडीवरील अत्याचाराची घटना ताजी असताना गुरु वारी भिवंडीतील २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना त्याच रुग्णालयात घडली.

The girl's molestation in 'civil' | ‘सिव्हिल’मध्ये तरुणीचा विनयभंग

‘सिव्हिल’मध्ये तरुणीचा विनयभंग

Next

ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात चिमुरडीवरील अत्याचाराची घटना ताजी असताना गुरु वारी भिवंडीतील २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना त्याच रुग्णालयात घडली. त्या तरुणीचे वडील रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले असून ती त्यांच्यासोबत रु ग्णालयात थांबली असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी त्या अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याचे रेखाचित्र रेखाटल्याची माहिती ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी दिली.
भिवंडी येथील पीडित तरु णीचे वडील क्षयरोगाच्या आजाराने ग्रस्त असल्याने ते ३ ते ४ दिवसांपासून उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय
रुग्णालयात दाखल आहेत. याचदरम्यान, रात्रीच्या वेळेस ती
रुग्णालयाच्या पुरुष वैद्यकीय कक्ष असलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावरील एका बाकड्यावर झोपली गेली होती. त्यावेळी रुग्णालयात आलेल्या ३० ते ३२ वर्षीय तरुणाने ती एकटीच असल्याची संधी साधून तिचा विनयभंग केला. हा प्रकार गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीच्या माहितीवरून त्या तरुणाचे तत्काळ रेखाचित्र रेखाटले आहे. ज्या इमारतीत हा प्रकार घडला, तेथे सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. कुलकर्णी अधिक तपास करत आहेत.
आरोग्य विभाग लक्ष देईल?
मागील १५ दिवसांत सिव्हिल रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसोबत असा प्रकार घडल्याने रुग्णालयात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून येथील सुरक्षा अक्षरश: वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतातरी आरोग्य विभाग ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षेकडे लक्ष देईल का, असा सवाल उपचारार्थ येणाºया रुग्णांच्या नातेवाइकांकडून विचारला जात आहे.
>न्यायालयीन कोठडी
उपचारार्थ दाखल असलेल्या आईला भेटण्यासाठी आलेल्या सहावर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला हरीश नरवार याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली. यापूर्वी त्याला दोन वेळा पोलीस कोठडी मिळाली होती.

Web Title: The girl's molestation in 'civil'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.