भिवंडीत पसंत नसलेल्या मुलावर लग्नापुर्वीच विषप्रयोग करून मुलीने काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 09:09 PM2018-08-20T21:09:43+5:302018-08-20T21:12:30+5:30

The girl removed the poison by using poisoning before the boy who did not like the biological choice | भिवंडीत पसंत नसलेल्या मुलावर लग्नापुर्वीच विषप्रयोग करून मुलीने काढला काटा

भिवंडीत पसंत नसलेल्या मुलावर लग्नापुर्वीच विषप्रयोग करून मुलीने काढला काटा

Next
ठळक मुद्देकुटूंबाने ठरविलेले लग्न न मोडता परस्पर काढला मुलाचा काटासमरीनने विषारी पदार्थ लावून दिलेले चॉकलेट अरकमने खाल्ले२३ आॅगस्टपर्यंत समरीनला पोलीस कोठडीत ठेवण्याचे कोर्टाचे आदेश

भिवंडी: शहरातील दर्गारोड येथे रहाणाऱ्या अरकम समसुद्दीन अन्सारी याचे समरूबाग येथे रहाणारी मुलगी समरीन अली अन्सारी हिच्या बरोबर लग्न ठरले होते.परंतू तीला अरकम पसंत नसल्याने तीने त्यास अपशब्द बोलून नामोहरम केले. तरी देखील तिला मिळविण्यासाठी अरकमने तिच्या सांगण्यावरून विषाची परिक्षा घेण्यासाठी तिने दिलेले चॉकलेट खाल्ले. त्या चॉकलेटवर तीने केलेल्या विष प्रयोगाचा परिणाम अरकमवर होऊन त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कुटूंबाने ठरविलेले लग्न न मोडता परस्पर काढला मुलाचा काटा काढला
शहरातील समरूबाग येथे रहाणाºया समरीन अली अहमद अन्सारी (२०)हिचे उस्मानी अपार्टमेंट मध्ये रहाणाºया अरकम समसुद्दीन अन्सारी (२४)याच्या बरोबर लग्न करण्याचे त्यांच्या कुटूंबांनी ठरविले होते. दरम्यान समरीन हीने वारंवार फोनवरून अरकमला वाईट बोलून त्याची अवहेलना केली होती. ‘तुला बघून मला घाण वाटते, तू मला पसंत नाही, तु माझ्या जीवनातून निघून जा’असे अपशब्द बोलून हा विवाह पसंत नसल्याचे ती सांगत होती. तरा देखील अरकमने तिच्याशी लग्न करण्याचे स्वप्न कायम ठेवले. त्यामुळे एक दिवस समरीनने मी विष दिले तरी तू खाणार काय? असा प्रश्न अरकमला केला असता त्याने मस्करी समजून होकार भरला. मात्र समरीनने ४ आॅगस्ट रोजी त्यास विषारी पदार्थ लावून दिलेले चॉकलेट खाण्यास दिले. ते चॉकलेट खाल्ल्याने अरकमला विषबाधा झाली. त्याच्यावर खाजगी रूग्णालयांत उपचार सुरू असताना त्याचा सायंकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र अरकमवर उपचार सुरू असताना त्याने आपल्या नातेवाईकांना मोबाईल मधील रिकॉर्ड तपासण्यास सांगीतले होते. हा धागा पकडून त्याच्या नातेवाईकांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीसांनी मोबाईल रिकॉर्डींग तपासून काल रविवार रोजी समरीन अन्सारी हिच्या विरोधात विषारी चॉकलेट देऊन अरकमला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.तीला आज सोमवार रोजी अटक करून कोर्टात हजर केले असता तीला २३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.

Web Title: The girl removed the poison by using poisoning before the boy who did not like the biological choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.