मुंब्रा खाडी पुलाजवळ अज्ञातांनी लोकलवर दगड भिरकावला, तरुणी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 10:16 IST2018-10-05T08:57:34+5:302018-10-05T10:16:31+5:30
मुंब्रा खाडी पुलाजवळ अज्ञातांची लोकलवर दगड भिरकावल्यामुळे एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

मुंब्रा खाडी पुलाजवळ अज्ञातांनी लोकलवर दगड भिरकावला, तरुणी जखमी
ठाणे : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलवर दगड भिरकावल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंब्रा खाडी पुलाजवळ अज्ञातांनी लोकलवर दगड भिरकावल्यामुळे एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. गुरूवारी (4 ऑक्टोबर) रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
कांचन विकास हटले (28) असं जखमी तरूणीचं नाव असून ती दिवा येथे राहणारी आहे. डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलवर भिरकावलेला दगड लागून कांचन गंभीर जखमी झाली. महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डोंबिवली लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात मुंब्रा व दिवा स्थानकादरम्यान ही घटना घडली. कांचनवर सध्या डोंबिवलीतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.