उल्हासनगर महापालिकेचा अजब फतवा, 10 फूट उंचीच्या मूर्ती विसर्जनास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 10:45 AM2018-08-27T10:45:16+5:302018-08-27T11:12:56+5:30

उल्हासनगर शहरातील विसर्जन घाटात 10 फूट उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनाला बंदी घालण्याचा अजब फतवा महापालिकेने काढल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.

ganpati visarjan in ulhasnagar | उल्हासनगर महापालिकेचा अजब फतवा, 10 फूट उंचीच्या मूर्ती विसर्जनास बंदी

उल्हासनगर महापालिकेचा अजब फतवा, 10 फूट उंचीच्या मूर्ती विसर्जनास बंदी

Next

सदानंद नाईक

उल्हासनगर : शहरातील विसर्जन घाटात 10 फूट उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनाला बंदी घालण्याचा अजब फतवा महापालिकेने काढल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. गणेश मंडळांनी उंच मूर्तीचा निर्णय घेऊन तशा मूर्ती यापूर्वीच बनविल्या आहेत. आयुक्तांनी यातून मार्ग काढून कल्याण खाडीचा मार्ग मोकळा करण्याची मागणी आता सेनेने केली आहे.

महापालिका आयुक्त गणेश पाटील यांनी गणेशोत्सवानिमित्त वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदिप गोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस, कल्याणजी घेटे, पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, नंदलाल समतानी, भगवान कुमावत, जनसंपर्क अधिकारी विनोद केणे आदींची बैठक घेऊन गणेशोत्सवाच्या रुपरेषेबाबत चर्चा केली. 3 वर्षापूर्वी उंच गणेश मूर्ती आणताना उच्च दाबाच्या विद्यूत वाहिनेचा धक्का बसून दोन गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. भविष्यात अशी घटना होऊ नये म्हणून कमी उंचीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करावी असे आवाहन सर्व स्तरातून त्यावेळी केले होते. 

गणेशोत्सव मंडळांनी नदी व खाडीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी पीओपीऐवजी शाडूच्या गणपती मूर्ती घ्याव्यात असे आवाहन हिराली फाऊंडेशन व मेरा फाऊंडेशने केले. तसेच विविध आकाराच्या मूर्ती त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. उल्हासनगरातील आय आय डी आय कंपनीजवळ सर्व सुखसुविधायुक्त विसर्जन घाट बनविला असून 10 फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्तीचे विसर्जन येथे होणार आहे.  तसेच सेंच्युरी रेयॉन, हिराघाट बोटक्लब, उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळील कृत्रिम तलाव, कैलास कॉलनी, गोलमैदान, शिवमंदिर घाट येथेही बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन, कैलास कॉलनी व गोलमैदान येथे कृत्रिम विसर्जन तलाव विसर्जनासाठी बनविण्यात आला आहे.

शिवसेना विचारणार जाब

शहरातील विसर्जन घाटावर 10 फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींना विसर्जन करण्याची बंदी घातल्याचा अजब फतवा पालिकेने काढला. याचा समाचार शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी घेतला आहे. आयुक गणेश पाटील यांनी यातून मार्ग काढून कल्याण खाडीचा मार्ग सुकर करण्याची मागणी केली. 
 

Web Title: ganpati visarjan in ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.