राजकीय दबावामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय - प्रदीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:24 AM2018-08-13T03:24:40+5:302018-08-13T03:24:50+5:30

ज्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम २०१३ मध्ये सुरू झाले आणि त्या टाकीचे काम दीड वर्षांपूर्वी पूर्णही झाले. मात्र असे असले तरी अजूनही या पाण्याच्या टाकीतून रहिवाशांना पाणीपुरवठा केला जात नाही.

Due to political pressure, water supply interrupted - Pradeep Patil | राजकीय दबावामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय - प्रदीप पाटील

राजकीय दबावामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय - प्रदीप पाटील

googlenewsNext

अंबरनाथ - ज्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम २०१३ मध्ये सुरू झाले आणि त्या टाकीचे काम दीड वर्षांपूर्वी पूर्णही झाले. मात्र असे असले तरी अजूनही या पाण्याच्या टाकीतून रहिवाशांना पाणीपुरवठा केला जात नाही. टाकीतून पुरवठा होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी केला आहे.
अंबरनाथसाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम २०१३ मध्ये सुरू झाले. या योजनेतून शहरात नवीन जलवाहिनी टाकणे आणि जलकुंभ उभारण्याचे काम प्रस्तावित केले होते. मात्र या कामासाठी झालेल्या विलंबामुळे शहरात पाण्याची आणीबाणी सुरू झाली. उल्हासनदी भरून वाहत असतानाही शहरात मात्र पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात नदीतून पाणी उचलण्यावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे त्या काळात अतिरीक्त पाणी उचलता येत नाही. मात्र आज उल्हासनदीला नैसर्गिक पाण्याची पातळीच जास्त आहे. त्यामुळे या नदीतून पाणी उचलण्यावर बंधने शिथिल केली आहेत. मात्र असे असले तरी अंबरनाथमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. अंबरनाथ पश्चिम भागातील कोहोजगांव,कमलाकरनगर, नारायणनगर, फुलेनगर, गौतमनगर, डीएमसी चाळ या भागात अजूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तसेच या भागात नव्याने विकसित होणा-या इमारतींनाही पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. याबाबत अधिकाºयांना विचारणा केली असता अधिकारीही समाधानकारक उत्तर देत नाहीत.
अंबरनाथ पश्चिम भागातील पाणी समस्येचे मूळ हे पाण्याचे जलकुंभ आहेत. हे जलकुंभ बांधून तयार असतानाही ते भरलेले नाही. वर्ष ते दोन वर्ष उलटूनही जलकुंभ भरण्यात येत नसल्याने जुन्याच यंत्रणेद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाल्याचे आणि त्यातून लवकरच पाणीपुरवठा केला जाईल असे निदर्शनास येताच राजकीय पक्षांनी श्रेयासाठी धावपळ केली. मात्र आधी पाणी द्या नंतर उद्घाटन करत बसा अशी काँग्रेसने भूमिका घेतल्याने या भागाला पाणी मिळणार नाही यासाठी राजकारण केले जात आहे. जीवन प्राधिकरणाच्या स्थानिक अधिकाºयांना हाताशी धरुन राजकीय दबाव टाकत जलकुंभ सुरू करण्यास विलंब लावला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. दीड वर्ष या भागातील नागरिकांनी पाण्यासाठी त्रास सहन केला आहे. आता या भागातील नागरिकांची संहनशीलता संपत आला आहे. बुधवारपर्यंत पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्यास पाण्याच्या टाकीवर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
या संदर्भात जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाºयांनाही कल्पना आहे. मात्र तेही या प्रकरणात लक्ष देत नाहीत. अधिकाºयांना निवेदनाची भाषा कळत नसल्याची जाणीव आम्हाला झाली असून त्यांचे कान आणि डोळे उघडतील असे आंदोलन गुरूवारी केले जाईल असा इशारा काँग्रेसने केला आहे.

कारणांची जंत्री सादर
नागरायणनगर येथील जलकुंभाचे काम होऊन दीड वर्ष उलटले आहे. मात्र जलवाहिनीच न टाकल्याने हा जलकुंभ सुरू झाला नाही. आधी जलवाहिनीचे आणि नंतर पंप नसल्याचे कारणे पुढे करुन जलकुंभ सुरु केला जात नाही.
प्राधिकरणाची उदासीनता
पंपाचे काम झाल्यावर या पंपाची चाचणी सुरू असल्याचे कारण पुढे केले जात आहे. चाचणी करून जलवाहिनीमधील गळती तपासली जात असल्याचे कारण पुढे केले जात आहे. मूळात ही चाचणी झाल्यावर लागलीच पाणीपुरवठा करणे शक्य आहे. मात्र ते कामही प्राधिकरण करत नाही. पुरेसे पाणी असतानाही शहरात टंचाई जाणवत असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Due to political pressure, water supply interrupted - Pradeep Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.