भिवंडी मनपाच्या तलावात तरूणाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने तलावास ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 09:23 PM2019-02-13T21:23:10+5:302019-02-13T21:30:05+5:30

भिवंडी : शहरात गौरीपाडा धोबीतलाव येथील स्व. परशराम टावरे क्रिडा संकुलात महानगरपालिकेच्या तरण तलावात तरूण मुलाचे निधन झाल्याने शहरात ...

Due to the death of the young man in the lake of Bhiwandi Municipal Corporation, | भिवंडी मनपाच्या तलावात तरूणाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने तलावास ठोकले टाळे

भिवंडी मनपाच्या तलावात तरूणाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने तलावास ठोकले टाळे

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा प्रशासनाने अखेर तरण तलावास लावले टाळेतरणतलावाचे व्यवस्थापन होते स्पोर्टिव्ह फिटनेस सेंटरकडे मनपाचे आयुक्त मनोहर हिरे यांच्या आदेशाने लावले टाळे

भिवंडी: शहरात गौरीपाडा धोबीतलाव येथील स्व. परशराम टावरे क्रिडा संकुलात महानगरपालिकेच्या तरण तलावात तरूण मुलाचे निधन झाल्याने शहरात असंतोष पसरला असून तरण तलाव ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी वाढू लागली आहे. शहरातील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत मनपा प्रशासनाने अखेर तरण तलावास आज टाळे लावण्याची कारवाई केली.
तीन दिवसांपुर्वी रविवारी दुपारच्या वेळेस पोहोण्यास गेलेल्या तरूणास पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. फरमान परवेझ खान(१९)असे तरूण मुलाचे नांव असून तो एन.सी.सी.चा कॅडर होता. तसेच त्याने लष्करात भरती होण्याची परिक्षा दिली होती. रविवारी झालेल्या दुर्घटनेमुळे शहरातील तरूणांमध्ये मनपा प्रशासना विरोधात असंतोष निर्माण झाला होता. महानगरपालिकेने हे तरण तलाव स्पोर्टिव्ह फिटनेस सेंटर या संस्थेस ठेके पध्दतीने चालविण्यास दिले होते. मात्र पालिकेने केलेल्या करारानुसार तरण तलावाची ठेकेदार संस्था आपले व्यवस्थापन करीत नसल्याने अनेक तक्रारी शहरातील नागरिकांनी व संस्थांनी या पुर्वी केल्या होत्या. त्याच प्रमाणे दुपारच्या काळात व्यवस्थापनातील काही कर्मचारी ठरावीक रक्कम घेऊन तलावात पोहोण्यासाठी मुलांना पाठवित होती. तसेच तरण तलावाच्या परिसरांत वाढदिवस,साखरपुडा व लग्नसमारंभ होत होती. या घटना होत असताना एका मुलाचा पाण्यात पडून मृत्यू झाला होता. असे असताना एका तत्कालिन आयुक्तांनी मेहरबान होऊन तरण तलावाबाहेरील जागी देखील या संस्थेच्या संबधितांना ३० वर्षाच्या ठेक्याने दिली. त्यामुळे संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये निष्काळजीपणा वाढला. त्यामधून तरण तलावात मृत्यू झाल्याची घटना घडल्याचा आरोप परिसरांतील नागरिकांनी व मृताच्या मित्रांनी केला. या बाबतची माहिती घेऊन मनपाचे आयुक्त मनोहर हिरे यांनी प्रभाग समिती क्र. ४ चे सहाय्यक आयुक्त शमीम अन्सारी यांना तरण तलाव सील करण्याचे आदेश दिले.त्यानुसार त्यांनी हे तरण तलाव सील केले आहे. मनपा प्रशासनाच्या या कारवाईचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

Web Title: Due to the death of the young man in the lake of Bhiwandi Municipal Corporation,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.