ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:51 AM2019-04-13T00:51:26+5:302019-04-13T00:51:30+5:30

खाद्याच्या किमती गगनाला : लाखो रुपयांच्या म्हशी कवडीमोल भावात विकल्या

Dairy business loss in rural areas | ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय धोक्यात

ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय धोक्यात

Next

वसंत पानसरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
किन्हवली : शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतीला पूरक जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र, म्हशींच्या वाढत्या किमती, अपुरे मनुष्यबळ तसेच त्यांना लागणारे पशुखाद्याचे वाढलेले भाव आणि दुधाला पाहिजे तेवढा भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात निराशा आली आहे.


अमुल दूध उत्पादक संघाने सरकारी अनुदानावर डेअरीच्या माध्यमातून शहापूर तालुक्यात डोळखांब, शहापूर, नडगाव, किन्हवलीसारख्या ग्रामीण भागात दूध संकलन केंद्र उभारले. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. यामुळे येथील बºयाच शेतकºयांनी कर्जाऊ म्हैस घेऊन उदरनिर्वाह म्हणून दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय निवडला. सुरुवातीला दुधाचे आणि खाद्याचे दर यामध्ये मेळ बसत असल्याने उत्पादकांना ते फायदेशीर पडत होते. मात्र, त्यानंतर अमुलने केलेली दरकपात, गगनाला भिडलेले खाद्याचे दर, विजेचे वाढते दर, वाढती मजुरी, औषधोपचारासाठी लागणारा खर्च, दूध संकलन केंद्रावर कमी भावात होणारी दुधाची खरेदी, खाद्य, मजुरी तसेच इतर खर्च परवडत नसल्याने बहुतेक उत्पादकांनी तोटा सहन करत ८० ते ९० हजार रु पयांत आणलेल्या म्हशी २५ ते ३० हजारांत विकून टाकल्या.


शेतीसोबतच जोडधंदा म्हणून अनेक उत्पादकांनी लाखो रु पये खर्च करून हरियाणा, गुजरात आणि इतर काही राज्यांमधून म्हशींची आयात केली. शेती नसेल तेव्हा या उद्योगाचा उपयोग होईल, असे त्यांना वाटत होते. मात्र, सद्य:परिस्थितीत अनेक दूध उत्पादकांना हा व्यवसाय करताना आर्थिक त्रास होत आहे. लाखो रु पये खर्चून दुभती जनावरे घेऊनही काहींना व्यवसाय बंद करावा लागला, तर काहींनी कमी नफ्यात कसातरी व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायासाठी संबंधितांना खाद्य, चाराव्यवस्था, विजेची व्यवस्था, दूधकाढणी यंत्र अशा अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे उत्पादक व्यवसाय पूर्णपणे बंद करू शकत नाही.

मात्र, सध्याच्या परिस्थितीत मिळेल त्या किमतीत समाधान मानण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. तरीही, याला फाटा देत बहुतेक उत्पादकांनी शेकडोंच्या संख्येने आणलेल्या म्हशी विकून टाकल्या आहेत. भावघसरणीमुळे अनेक उत्पादक हे डेअरीमध्ये दुधाची विक्र ी न करता शहरात वैयक्तिक घरोघरी फिरून दुधाची विक्र ी करतात. त्याठिकाणी शेतकºयांना म्हशीच्या दुधाला ६० ते ७० रु पये प्रतिलीटर, तर गायीच्या दुधाला ४० ते ५० रु. प्रतिलीटर असा भाव मिळतो. तेच दूध डेअरीमध्ये विक्र ीस नेल्यास पाच रु पये ६० पैसे फॅट या दराने ३० ते ३५ रु. भाव मिळतो. म्हशीच्या एक लीटर दुधामागे खाद्य, चारा, मजुरी, वीजबिल असे घटक पकडून ३३ ते ३५ रु पये खर्च येत असतो.

पौष्टिक खाद्याकडे ठेवावे लागते विशेष लक्ष
दूध उत्पादक शेतकºयांना जनावरांच्या पौष्टिक खाद्यावर विशेष लक्ष ठेवावे लागते. मात्र, हे खाद्य महाग असल्याने तिथेही शेतकºयांचे हाल होतात. म्हशींना लागणारी सरकी तीन हजार रुपये क्विंटल, भुसा १८००, चुनी दोन हजार ४० ते २४०० रुपये, चनाचुनी २३००, मका २४००, पत्रीपेंड साडेचार हजार या दराने मिळते. सहा महिन्यांपूर्वी या खाद्याच्या किमती ८०० ते १००० रु पये क्विंटल दराने स्वस्त होत्या.
 

दुग्ध व्यवसायात वाढ करण्यासाठी आमच्या विभागाकडून शेतकºयांना मार्गदर्शन केले जाते. तसेच आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शन केले जाईल. आम्हाला वरिष्ठस्तरावरून जे आदेश येतात, त्यानुसार आम्ही काम करत असतो.
- ए.ए. पावरा, पशुधन विकास अधिकारी

Web Title: Dairy business loss in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.