कंटेनरखाली चिरडून पोलिसाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:44 PM2019-07-07T23:44:07+5:302019-07-07T23:44:10+5:30

भिवंडीनजीकची घटना : ओव्हरलोड ट्रकचा पाठलाग करताना घडली दुर्घटना

Crushing under the container and killing the policeman | कंटेनरखाली चिरडून पोलिसाचा मृत्यू

कंटेनरखाली चिरडून पोलिसाचा मृत्यू

Next

भिवंडी : वाडा येथील स्टील कंपनीमधून लोखंडी सळया व अँगल भरून वडपा बायपासकडे निघालेल्या ओव्हरलोड ट्रकचा मोटारसायकलने पाठलाग करताना, ट्रकचालकाने गतिरोधकावर जोरदार ब्रेक लावल्याने मोटारसायकल ट्रकवर आदळून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री चाविंद्रा, पोगावफाटा येथे घडली. दादासो रामचंद्र सिंगे (३५, रा.बदलापूर ) हे पोलीस कर्मचाºयाचे नाव आहे.


पोलीस कर्मचारी दादासो सिंगे हे भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असून, ते रात्री गस्तीवर होते. त्यावेळी वडपा बायपासच्या दिशेने लोखंडी सळया व अँगलने भरलेला ट्रक त्यांना दिसल्याने त्यांनी कारवाईसाठी त्या ट्रकचा पाठलाग केला. मात्र ट्रकचालक पळून जात असताना पोगावफाटा येथे गतिरोधकावर त्याने अर्जंट ब्रेक लावला. त्यामुळे ट्रकमधील सळया व अँगल विरु द्ध दिशेने समोरून येणाºया कंटेनरवर आदळले व समोरून येणाºया कंटेनरच्या केबिनमध्येदेखील या सळया व अ‍ँगल घुसले होते. सुदैवाने कंटेनरचालक बचावला. मात्र त्याचदरम्यान दुचाकीने ट्रकचा पाठलाग करणारे दादासो सिंगे हेदेखील लोखंडी एंगलवर जाऊन आदळले. अँगल त्यांच्या छातीत घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना बेशुद्धावस्थेत स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रु ग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तालुका पोलिसांनी ट्रक व कंटेनर ताब्यात घेतला आहे. अपघातातून बचावलेला कंटेनरचालक हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला, तर ट्रकचालक फरार झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय पंकज घाटकर करीत आहे.

भिवंडीत खड्ड्याने घेतला दुचाकीस्वाराचा बळी
भिवंडी : खड्डा चुकवताना भरधाव दुचाकीस्वार कंटेनरखाली सापडून, लेबर कॉन्ट्रॅक्टर जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी मुंबई - नाशिक महामार्गावरील सोनाळे गावाच्या हद्दीतील एका पेट्रोलपंपासमोर घडली. सतीश जगन्नाथ साखरे ( ४६, रा.टेमघरपाडा ) हे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

नदीत बुडून तरु णाचा मृत्यू
मीरा रोड :काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेना नदीत बुडून दहिसर पूर्वेतील भारवाड चाळीत राहणाºया २४ वर्षीय राहुल राजभर याचा रविवारी मृत्यू झाला. रविवार सुटी असल्याने राहुल हा आपल्या ५ मित्रांसह चेना नदी परिसरात पार्टी करण्यासाठी गेला होता. दारूची पार्टी करून नशेत असलेला राजभर हा नदीत उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

एक्स्प्रेसच्या धडकेत तरु णी ठार
वासिंद : एक्स्प्रेसखाली सापडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना येथील रेल्वेस्थानकाजवळ रविवारी घडली. कसारा डाउन ट्रॅकवर ४.४५ वाजता हा अपघात घडला. हा अपघात आहे की आत्महत्या, याचा तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करीत असल्याचे स्टेशन प्रबंधक यांनी सांगितले.

Web Title: Crushing under the container and killing the policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.