अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:51 AM2017-12-06T00:51:44+5:302017-12-06T00:51:57+5:30

गुजरातच्या दिशेने सरकलेल्या ओखी वादळामुळे सतर्कता बाळगावी, अशी सूचना हवामान खात्याने केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती.

Crop damage due to unpredictable rain | अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान

अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान

Next

गुजरातच्या दिशेने सरकलेल्या ओखी वादळामुळे सतर्कता बाळगावी, अशी सूचना हवामान खात्याने केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती. आपत्ती व्यवस्थापनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी जोरदार वाºयासह पाऊस पडेल असा इशारा दिल्याने सरकारने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी मात्र चिंतातूर झाले आहेत. मच्छिमारांनी आपल्या बोटी वेळेत नांगरल्याने पुढील अनर्थ टळला. पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला होता. इंटरनेट सेवेतही व्यत्यय आला.

उत्तनमध्ये मासेमारी बोटी सुरक्षित
भार्इंदर : ओखी वादळामुळे जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सोमवारी सायंकाळपर्यंत जेटीजवळ नांगरण्यात आल्या. त्यामुळे तूर्तास त्या सुरक्षित असून किनाºयावरील मासळी सुकवण्याच्या जागेतील साहित्याचे मात्र किरकोळ नुकसान झाल्याचे पाली मच्छिमार सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले.
ओखी वादळामुळे मासेमारी बोटींना समुद्रात मच्छिमारीसाठी जाण्यास बंदी घातल्याने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारीच जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनांना सावधनतेचा इशारा दिला होता. त्यानुसार मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनीही पश्चिम किनारपट्टीवरील शहराच्या हद्दीतील भाटेबंदर ते पाली दरम्यानच्या मच्छिमारांना अतिदक्षतेचा इशारा दिला होता. पालिकेसह जिल्हा प्रशासन व उत्तन-सागरी पोलिसांनी किनाºयाचा ताबा घेत समुद्रात जाणाºयांना रोखले. दर १५ मिनिटांनी वादळाचा वेध घेत किनाºयावरील मच्छिमारांना जागरूक राहण्यासाठी त्याची माहिती दिली जात होती.
मंगळवारी मध्यरात्री मोठ्या भरतीमुळे पाण्याची पातळी वाढली होती. मात्र त्यात किनाºयावरील काही साहित्यांचे किरकोळ नुकसान झाल्याचे डिमेलो म्हणाले. तसेच उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे यांनी सांगितले की, तीन दिवसांपासून किनाºयावरील मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देणे सुरू होते. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी वेळेतच किनाºयावर नांगरण्यात आल्या. तरीदेखील पोलिसांची किनाºयावर गस्त सुरू असून वादळाचा आढावा सतत घेतला जात आहे. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरु झाली.

भाजीपाला उत्पादक चिंतातूर
अंबाडी : ओखी वादळामुळे मंगळवारी झालेल्या अवेळी पावसाने भाजीपाला उत्पादनावर विपरित परिणाम होणार असल्याने भिवंडी तालुक्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. पावसाने खळ््यांवरील न झोडलेले भातपिक व झोडणी झालेल्या भातपिकाचे तण यांचे मोठे नुकसान झाले. तर भाजीपाला उत्पादक शेतकºयांनी लागवड केलेल्या विविध पिकांच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर विपरित परिणाम होणार असून या हवामान बदलामुळे उत्पादनासाठी तयार भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रार्दुभाव होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बदलापूरमध्ये जनजीवन विस्कळीत
बदलापूर : बदलापूर शहरात सोमवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाºयासह पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी बदलापूरमध्ये केवळ पावसानेच हजेरी लावली.अवेळी पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणी साचले होते. चिखल झाल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले होते. अनेकांनी कामावर जाण्याचे टाळले. सक्तीची रजा घेऊन नागरिकांनी घरी राहणेच पसंत केले.

उल्हासनगरमध्ये विजेचा लपंडाव
उल्हासनगर : मंगळवारी झालेल्या पावसामुळे बहुतांश रस्त्यांवर चिखल साचला होता. विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले होते.
शहरात सोमवारपासून रिमझिम पावसाने हजेरी लावताच विजेचा लंपडाव सुरू झाला. नागरिकांना सोमवारी रात्री ५ ते ६ तास अंधारात काढावे लागले. मंगळवारीही वीज ये-जा करत होती. शहरातील रस्त्याची दुरूस्ती व खड्डे भरण्याचे काम सुरू असल्याने, रस्त्यात रिमझिम पावसाने चिखल झाला. नेहरू चौक ते फॉरवर्ड लाईन, मोर्यानगरी ते व्हीटीसी ग्राउंड रस्ता, कॅम्प नं-५ येथील मुख्य रस्ता, शहाड ते पालिका रस्ता, डॉल्फिन ते शांतीनगर रस्ता, पवई चौक ते विठ्ठलवाडी स्टेशन रस्ता येथे चिखल झाला होता.
शाळांना सुटी दिल्याची कल्पना अनेक विद्यार्थी व पालकांना नसल्याने, ते वेळेत शाळेमध्ये आले. मात्र सुटी असल्याचे समजल्यावर अनेक विद्यार्थ्यांनी घरी भिजत जाणे पसंत केले. सुरक्षेचा उपाय म्हणून काही ठिकाणी वीज पुरवठा बंद ठेवला होता अशी माहिती महावितरणच्या अधिकाºयांनी दिली.
 

Web Title: Crop damage due to unpredictable rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.