यंदा ठाण्यात तुळशीबाग आणि चिंतामणीही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 03:06 AM2017-08-18T03:06:52+5:302017-08-18T03:06:55+5:30

यंदा ठाण्यातील मूर्तिकारांनी पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीपाठोपाठ तुळशीबागेतला गणपती आणि मुंबईच्या लालबागपाठोपाठ चिंतामणी गणपती तयार केले आहेत.

Consider In a consider - times birthday day residence In a bed ac In Ineschch In In Whatever In In Whatever বরং Whatever Well Being In - Whatever, | यंदा ठाण्यात तुळशीबाग आणि चिंतामणीही!

यंदा ठाण्यात तुळशीबाग आणि चिंतामणीही!

googlenewsNext

प्रज्ञा म्हात्रे ।
ठाणे : यंदा ठाण्यातील मूर्तिकारांनी पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीपाठोपाठ तुळशीबागेतला गणपती आणि मुंबईच्या लालबागपाठोपाठ चिंतामणी गणपती तयार केले आहेत. एकीकडे नवीन मूर्ती आल्या असताना दुसरीकडे लालबागचा राजा आणि दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीही फॉर्मात असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
तुळशीबागेतला गणपती यंदा पाहायला मिळत आहे. नियमित रंगांबरोबर तो खास शेंदरी रंगातदेखील बनवला आहे. दीड ते चार फुटांपर्यंत ही मूर्ती आहे. २१०० ते १२००० रुपये अशी किंमत आहे. घरगुतीबरोबर सार्वजनिक मंडळांनीही तिला पसंती दिल्याचे मूर्तिकार घनश्याम कुंभार यांनी सांगितले. विठ्ठलरूपी बसलेला गणपती, वासुदेवरूपी, फुलांमधला मल्हारी मार्तंड, नवरंग, हणमंतरूपी, शिवशंकर, विष्णुरूपी गणेशमूर्ती नव्याने पाहायला मिळत आहे. डायमंड वर्क केलेल्या गणेशमूर्तींनाही मागणी आहे. बाहुबली-२ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या शिवगामीदेवीच्या आसनावर बसवलेल्या बाहुबलीरूपातील गणपतीची मूर्तीही दोन आणि चार फुटांमध्ये उपलब्ध आहे. नऊ फुटांची हत्तीच्या अंबारीमध्ये बसलेली बाहुबली गणेशमूर्ती, हत्तीचा डोक्यावर उभा असलेला अडीच फुटांचा बाहुबली गणेशा या तिन्ही मूर्तींना सार्वजनिक मंडळांची पसंती आहे.
>बालहट्टामुळे बालगणेशमूर्तींना मागणी
बालहट्टामुळे बालगणेशमूर्तींची मागणी वाढत आहे. यातही नवनवीन मूर्ती आल्या आहेत. मूषकस्वारी, मोटारसायकलस्वारी, टोपी घालून पियानो वाजवणारा हे प्रकार पाहायला मिळत आहे. यात लकी मॅन बालगणेशाची मूर्तीही आली आहे. फेंगशुईच्या खांद्यावर बसलेलीही मूर्ती आहे.
शाडूच्या मूर्तींमध्ये दरवर्षी वाढ
पर्यावरणस्नेही गणेशमूर्तींकडे भक्तांचा कल दरवर्षी वाढत आहे. ६० टक्के पीओपी तर ४० टक्के शाडूच्या मूर्ती असे यंदाचे प्रमाण आहे. गतवर्षी आम्ही १००० शाडूच्या मूर्ती बनवल्या होत्या. यंदाची मागणी पाहता ११०० मूर्ती बनवल्या असल्याचे कुंभार म्हणाले.
>कामगारांमध्ये आणि त्यांच्या वेळांमध्ये
झाली वाढ
यंदा गणेशोत्सव लवकर आल्याने कामगारांच्या संख्येत मूर्तिकारांनी वाढ केली आहे. तसेच त्यांच्या कामाच्या तासांतही वाढ झाली असून १२ तास काम करणारे कामगार सध्या १६ तास काम करत आहे.
>फायबरच्या गणेशमूर्तींनाही पसंती
पीओपी, इकोफ्रेण्डलीबरोबर फायबरच्या गणेशमूर्तींनाही भक्त पसंती देत आहेत. गिफ्ट शॉप्स किंवा प्रदर्शनात त्या प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत.

Web Title: Consider In a consider - times birthday day residence In a bed ac In Ineschch In In Whatever In In Whatever বরং Whatever Well Being In - Whatever,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.