उपेक्षित आयुष्यामुळे केला खुनासह बलात्कार, अटकेनंतर केले पोलिसांचेच अभिनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 06:38 AM2018-03-13T06:38:16+5:302018-03-13T06:38:16+5:30

अंबरनाथ येथे प्रियकराचा खून करून, प्रेयसीवर बलात्कार करणा-या आरोपीला उपेक्षित आयुष्य नशिबी आल्याचा संताप होता. या संतापातूनच केलेल्या या गुन्ह्यामध्ये त्याने कुणाचीच मदत घेतली नव्हती.

Congratulations to police who have been arrested for rape, murder and murder due to neglected life | उपेक्षित आयुष्यामुळे केला खुनासह बलात्कार, अटकेनंतर केले पोलिसांचेच अभिनंदन

उपेक्षित आयुष्यामुळे केला खुनासह बलात्कार, अटकेनंतर केले पोलिसांचेच अभिनंदन

googlenewsNext

ठाणे : अंबरनाथ येथे प्रियकराचा खून करून, प्रेयसीवर बलात्कार करणा-या आरोपीला उपेक्षित आयुष्य नशिबी आल्याचा संताप होता. या संतापातूनच केलेल्या या गुन्ह्यामध्ये त्याने कुणाचीच मदत घेतली नव्हती. त्यामुळे आपणास अटक होणार नाही, हा फाजील आत्मविश्वास असलेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तेव्हा त्याने या कामगिरीबद्दल चक्क पोलिसांचे अभिनंदन केले.
अंबरनाथजवळच्या चिंचपाडा येथून नालंबीकडे जाणा-या रोडवर एका युवकाचा बंदुकीने खून करून, त्याच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी संजय सिद्धार्थ नरवडे (२५) याला ठाणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी शिताफीने अटक केली. त्याच्याजवळून परदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, काही जिवंत काडतुसे, खून केलेल्या युवकाचा मोबाइल फोन, त्याच्या मोटारसायकलची चावी आणि इतर साहित्य हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपी मूळचा जालनातीलअंबड तालुक्यातील गोंदी येथील रहिवासी असून, आईवडिलांशी पटत नसल्याने, तो उल्हासनगरातील प्रशिक गेस्ट हाउसमध्ये राहत होता. तो रिक्षा चालक असून, दहावी पास आहे. प्रियकराचा खून, प्रेयसीवर बलात्कार केल्यानंतर त्याने प्रियकराचा मोबाइल घेतला. तो लॉजजवळच एका उत्तर प्रदेशच्या रहिवाशाला विकला. ही माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली.
>आणखी एक गुन्हा
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षी अशाच प्रकारचा एक गुन्हा घडला होता. या घटनेमध्ये आरोपीने एका प्रियकर आणि प्रेयसीला बंदुकीच्या धाकावर लुटले होते. मात्र, ते घटनास्थळ गजबजलेले असल्याने, प्रेयसी आरोपीच्या तावडीतून सुटली होती. आरोपीच्या अटकेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हा गुन्हादेखील उघडकीस आला आहे.

Web Title: Congratulations to police who have been arrested for rape, murder and murder due to neglected life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस