पालिकेचे स्वच्छता अभियान जोरात; आयुक्तांनी घेतली नगरसेवकांची कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 05:43 PM2017-12-15T17:43:52+5:302017-12-15T17:44:34+5:30

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी स्वच्छता अभियान मोहीम जोरात सुरू केली आहे.

Cleanliness drive of youth; Workshop by corporators took councilors' workshop | पालिकेचे स्वच्छता अभियान जोरात; आयुक्तांनी घेतली नगरसेवकांची कार्यशाळा

पालिकेचे स्वच्छता अभियान जोरात; आयुक्तांनी घेतली नगरसेवकांची कार्यशाळा

Next

- राजू काळे
भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी स्वच्छता अभियान मोहीम जोरात सुरू केली आहे. त्यात थेट आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी नगरसेवकांच्या कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी पालिका मुख्यालयात केले होते.

पालिकेने प्रामुख्याने आयुक्तांनी यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात गतवेळपेक्षा वरचा क्रमांक मिळविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी स्वच्छतेचे मोबाईल अ‍ॅपदेखील सुरू केले असून, त्यावर नागरिकांनी स्वच्छतेप्रती समाधान व्यक्त करायचे आहे. स्वच्छतेचा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी सर्वांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचारी व अधिकारी धावपळ करीत असून ते मोबाईल अॅप डाऊनलोड करणा-याचा मोबाईल क्रमांक व स्वाक्षरीची नोंद करून त्याचा अहवाल प्रशासनाला दररोज सादर करीत आहेत. त्या अहवालाच्या पडताळणी कामासाठी देखील अधिका-यांना जुंपण्यात आले आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, शिक्षक, व्यापारी व ज्येष्ठ नागरिक संघटना, गृहनिर्माण संस्था आदींमध्ये कार्यशाळा आयोजित करून लोकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती केली जात आहे.

या स्वच्छतेप्रति प्रशासनाने शहरातील नगरसेवकांची १७ नोव्हेंबरला नगरभवन सभागृहात येथील कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी एकूण ९५ पैकी केवळ दोनच नगरसेवकांनी हजेरी लावल्याने नगरसेवकांची स्वच्छतेप्रति असलेली भावना त्यावेळी चव्हाट्यावर आली होती. त्यानंतर आयुक्तांनी पुढाकार घेत शुक्रवारी पालिका मुख्यालयात नगरसेवकांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. मात्र त्यालाही सुरुवातीला नगरसेवकांनी बेताची उपस्थिती लावली. मात्र अधिका-यांनी सतत संपर्क साधल्यानंतर काही नगरसेवकांचे आगमन सुरू झाले. यानंतरही ९५ पैकी सुमारे ४० नगरसेवकांनी कार्यशाळेला हजेरी लावली. या कार्यशाळेत उपस्थित नगरसेवकांना स्क्रीनद्वारे स्वच्छतेची माहिती देण्यात आली. यावेळी प्रशासनाने नगरसेवकांना स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छतेच्या विविध प्रकारांना देण्यात येणा-या गुणांकनाविषयाची माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

जास्तीत जास्त लोकांना स्वच्छतेच्या मोबाईल अ‍ॅपचे डाऊनलोड करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन नगरसेवकांना करण्यात आले. यावेळी ज्या नगरसेवकांकडुन त्यांच्या प्रभागातील १०० टक्के स्वच्छतेचे काम केले जाईल त्या प्रभागाच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा देखील करण्यात आली. मात्र प्रभागांत कायम असलेली अस्वच्छता अनेकदा तक्रार करूनही स्वच्छ केली जात नसल्याचा सूर अनेक नगरसेवकांनी आळवला.

सेनेच्या नगरसेविका स्नेहा पांडे यांनी तर भार्इंदर पुर्वेच्या आझादनगर (स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रस्तावित असलेली जागा) येथील अस्वच्छतेवर आसूड ओढीत या घाणीचे साम्राज्य पसरलेल्या ठिकाणी एका लहान मुलीची अत्याचारानंतर हत्या तर दोन दिवसांपूर्वी एका मुलीवर प्राणघातक हल्ला करून तिला तेथीलच कच-यात फेकण्यात आले. यामुळे प्रशासनाने पसरलेली घाण साफ न करताच स्वच्छतेचा बडेजाव करु नये, असे प्रशासनाला सुनावले. यावेळी महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी सभापती ध्रवकिशोर पाटील, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, नगरसचिव वासुदेव शिरवळकर आदी उपस्थित होते.

Web Title: Cleanliness drive of youth; Workshop by corporators took councilors' workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.