भिवंडी नदीनाका शेलाररस्ता पाण्याखाली, रिक्षा-दुचाकीची वाहतूक बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 03:51 PM2018-07-07T15:51:05+5:302018-07-07T15:51:21+5:30

भिवंडी तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर भिवंडीच्या कामवरी नदीला पूर आला आहे

Bhiwandi river Shelar road under water, rickshaw-bicycle traffic stop | भिवंडी नदीनाका शेलाररस्ता पाण्याखाली, रिक्षा-दुचाकीची वाहतूक बंद

भिवंडी नदीनाका शेलाररस्ता पाण्याखाली, रिक्षा-दुचाकीची वाहतूक बंद

Next

- रोहिदास पाटील
अनगांव - भिवंडी तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर भिवंडीच्या कामवरी नदीला पूर आला आहे, भिवंडी-वाडा महामार्गावरील नदीनाका शेलार रस्ता पाण्याखाली गेल्याने रिक्षा-दुचाकी यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पडणा-या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने शेलार नदिनाका परिसरात डाईंग कंपनीचे बांधकाम झाल्याने पाऊस रस्त्यावरून वाहत आहे. सध्या छोट्या वाहनाची वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर मोठी वाहने धिम्या गतीने सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. तर कामवरी नदीला पूर आल्याने कवाड गोराईकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद आहे. लोकांची गैरसोय होत आहे.

Web Title: Bhiwandi river Shelar road under water, rickshaw-bicycle traffic stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे