भिवंडीत झाला ‘अभिनंदन’चा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:37 AM2019-03-04T05:37:38+5:302019-03-04T05:37:52+5:30

विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानमधून परतण्याच्या वेळी भिवंडी येथील खासगी दवाखान्यात जन्मलेल्या एका मुलाचे नाव त्याच्या कुटुंबाने ‘अभिनंदन’ ठेवले आहे.

Bhendand was born 'congratulations' | भिवंडीत झाला ‘अभिनंदन’चा जन्म

भिवंडीत झाला ‘अभिनंदन’चा जन्म

Next

भिवंडी : विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानमधून परतण्याच्या वेळी भिवंडी येथील खासगी दवाखान्यात जन्मलेल्या एका मुलाचे नाव त्याच्या कुटुंबाने ‘अभिनंदन’ ठेवले आहे.
कर्नाटक येथील कडप्पा शहरात राहणाऱ्या मांगीलाल जैन यांचा मुलगा आकाश याचा विवाह शहरातील कासारआळीत राहणाऱ्या मोनिका हिच्याशी झाला. तिच्या पहिल्या प्रसूतीसाठी तिचे कुटुंबीय कर्नाटक येथून शहरात आले होते. पाकिस्तानहून विंग कमांडर अभिनंदन भारतात परतण्याच्या वेळी मोनिकाने मुलाला जन्म दिल्याचा योगायोग जुळून आला. त्यामुळे मांगीलाल जैन यांनी नातवाचे नामकरण ‘अभिनंदन’ असे केले. नातू झाल्याचा आनंद साजरा करत असताना, मांगीलाल जैन यांनी ज्याप्रमाणे विंग कमांडरने कर्तृत्व देशाचे नाव जगात उज्ज्वल केले, त्याप्रमाणे आमचा नातूदेखील देशाचे नाव उज्ज्वल करेल, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. नातवाचे बारसे होऊन त्याचे नामकरण होणार आहे, परंतु संपूर्ण देश विंग कमांडर अभिनंदन परतल्याचा आनंद साजरा करत आहे. त्यापेक्षा मोठा माझ्या नातवाच्या नामकरणाचा दुसरा आनंदाचा क्षण असू शकत नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Bhendand was born 'congratulations'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.