बील थकले, वीज कट, फोन बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 11:21 PM2019-01-31T23:21:14+5:302019-01-31T23:22:00+5:30

तारापूर, डहाणू, बोईसर पालघर मधील मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली असून त्याचा फटका शासकीय कार्यालये, बँका आदीना बसून व्यवहार बंद पडले आहेत

Beel tired, power cut, phone off | बील थकले, वीज कट, फोन बंद

बील थकले, वीज कट, फोन बंद

पालघर : जिल्ह्यातील बीएसएनएलच्या तारापूर केंद्रांतर्गत वीज बिलांची १८ लाख ८६ हजार ३७३ हजारांची रक्कम थकल्याने ८ मुख्य केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने तारापूर, डहाणू, बोईसर पालघर मधील मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली असून त्याचा फटका शासकीय कार्यालये, बँका आदीना बसून व्यवहार बंद पडले आहेत.

तारापूरच्या भारत संचार निगम लिमिटेडच्या केंद्रांतर्गत येणाऱ्या डहाणूच्या उपविभागीय कार्यालयाची ५ लाख ९७ हजार ३४० रुपयांची थकबाकी असून, उपविभागीय अभियंता विभागाची २ लाख २२ हजार ३१३ रुपये, नरपड (डहाणू) विभागाची २६ हजार ७१०, पालघर (माहीम) च्या उपविभागीय अभियंता विभागाची ३ हजार ५८०, पालघर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची ४६ हजार २०० रुपये, बोईसर (आर) उपअभियंता विभागाचे ४६ हजार ११० रुपये, बोईसर (आर) उपविभागीय अधिकारी कार्यालयाची ११ हजार ८१० रुपये तर तारापूर एमआयडीसी मधील कनिष्ठ टेलिकॉम अधिकारी कार्यालयाची ९ लाख ३२ हजार ३१० रुपये असे एकूण १८ लाख ८६ हजार ३७३ हजार रु पयांची थकबाकी आहे.

महावितरणने बुधवारी एकूण ८ विभागाचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे तारापूर अणुऊर्जा केंद्रासह बँका, शासकीय कार्यालये, सायबर कॅफे, तसेच खाजगी व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. वसई च्या टेलिफोन एक्स्चेंज कार्यालयाचीही मोठी थकबाकी असल्याने विद्युत वितरण वसई विभागाचे अधिकारी विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथील एका अधिकाºयाने काही दिवसाची मुदत मागितल्याने कारवाई टळल्याचे बीएसएनएलच्या एका अधिकाºयाने लोकमतला सांगितले.

जिल्ह्यातील बीएसएनएलच्या बेपर्वाईमुळे दूरसंचार विभागाच्या तारापूर, पालघर, बोईसर, माहीम आदी केंद्रांसह जिल्ह्यातील बहुतांशी दूरध्वनी केंद्रासह कार्यालयाची वीजदेयके न भरल्याने या दूरध्वनी केंद्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार दूरध्वनी व बीएसएनएलची मोबाइल व इंटरनेट सेवा खंडित झाली आहे. सर्वत्र कामाचा खोळंबा झाल्याने ओरड सुरू झाल्याने जनरेटर अथवा इन्व्हर्टरच्या आधारावर ही सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर वरिष्ठ पातळीवरून थकबाकी रक्कम भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

ग्राहकांची पाठ ; शेकडो दूरध्वनी जोडण्या बंद
बीएसएनएलच्या दूरध्वनी सेवेबरोबर इंटरनेट व मोबाइल सेवा खंडित झाल्याने वेस्टर्न टेलिकॉम रिजन (डब्ल्यू टी आर) द्वारा इतर राज्यांना जोडणारी दूरध्वनी सेवादेखील खंडित झाली आहे. एक बाजूला बीएसएनएलची ही अवस्था असतानाच दुसºया बाजूला ग्राहकांना व्यवस्थित सेवा देण्यास असमर्थ ठरत असल्याने दर आठवड्याला शेकडो दूरध्वनी ग्राहक स्वत:च आपल्या दूरध्वनी जोडण्या बंद करत आहेत.

बीएसएनएलच्या या कारभारामुळे येथील इंटरनेट सेवा देखील ग्राहक बंद करू लागले असून ते खाजगी सेवा अथवा केबलनेट सेवेच्या वापराकडे वळत आहेत, बीएसएनएलच्या लँड लाईन सेवे ऐवजी विविध खाजगी कंपनीच्या मोबाईल सेवेकडे जिल्ह्यातील ग्राहकमोठ्या प्रमाणात वळल्याने त्याचाही आर्थिक परिणाम बीएसएनएलवर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याची विद्युत देयके भरण्याची क्षमताच दिवसेंदिवस कमी होते आहे.

Web Title: Beel tired, power cut, phone off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.