सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत, सौरभ राव यांचे निर्देश

By अजित मांडके | Published: April 20, 2024 03:39 PM2024-04-20T15:39:23+5:302024-04-20T15:42:17+5:30

वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फूटपाथची साफसफाई  करण्यात आली.

Beat marshals should be posted by putting up no-littering boards in public places says Saurabh Rao | सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत, सौरभ राव यांचे निर्देश

सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत, सौरभ राव यांचे निर्देश

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छता अभियान शनिवारी महापालिकेच्या वर्तकनगर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आले. या ठिकाणी असलेल्या तानसा पाईप लाईनच्या दोन्ही बाजूला जाळ्या बसवाव्यात तसेच कचरा न टाकण्याचे फलक लावावेत व परिसरात मार्शलची नेमणूक करावी , तसेच शहरात रस्त्यांच्या कडेला पडलेला राडारोडा उचलण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तानसा पाईप लाईन परिसर, उपवन तलाव परिसरात कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करणारे फलक लावावेत, तसेच सुरक्षारक्षक नेमावेत, तसेच ज्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत त्या कुंड्यांमधील कचरा दिवसातून दोन वेळा उचलला जाईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. तसेच शहरात ज्या ज्या रस्त्याच्या बाजूला पडलेले डेब्रिज उचलण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी उपवन तलाव परिसरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून येथील सफाईबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फूटपाथची साफसफाई  करण्यात आली.  उपवन तलाव येथील पालायदेवी मंदिर, ते उपवन तलाव परिसर, बनारस घट परिसर, माजिवडा नाका ते गांधीनगर पाण्याची टाकी (दुभाजक), येऊर फॉरेस्ट ते रिक्षास्टॅण्ड, वर्तकनगर नाका (तानसा), वसंतविहार शाळा ते महावीर मिलेनियम, सिद्धांचल क्लब हाऊस ते एचडीएफसी बँक  आदी परिसरातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. यावेळी या मोहिमेत सहभागी झालेल्या शिवशांती प्रतिष्ठान संस्थेसह महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांनी शहर स्वच्छ ठेवणेबाबतची शपथ घेतली.तसेच उपवन येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणा-या झिरो डंपिंग ग्राउंड या वाहनाची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली.

आयुक्तांनी साधला नागरिकांशी संवाद
रस्त्यावर कचरा टाकणा-या नागरिकांना दंड लावावा जेणेकरून नागरिक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत तसेच उपवन तलाव येथे जे नागरिक तलावात निर्माल्य टाकतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली. तसेच उपवन तलाव येथे असलेला परिवहनचा थांबा रस्ता रूंदीकरणाच्या कामात काढण्यात आला होता मात्र तो अद्याप बसविण्यात न आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, थांबा नसल्यामुळे बसेस थांबत नाहीत, त्यामुळे हा थांबा बसविण्याची मागणी नागरिकांनी केली, याबाबत कार्यवाही केली जाईल असे आयुक्तांनी यावेळी नमूद केले.

Web Title: Beat marshals should be posted by putting up no-littering boards in public places says Saurabh Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.