ऐन गणेशोत्सवात भिवंडीमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 03:42 AM2018-09-17T03:42:07+5:302018-09-17T03:42:31+5:30

भाविकांमध्ये पालिकेविरोधात संतापाचे वातावरण

Badminton empire in Bhiwandi at An Ganesh Festival | ऐन गणेशोत्सवात भिवंडीमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य

ऐन गणेशोत्सवात भिवंडीमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य

Next

भिवंडी : मागील काही वर्षापासून ऐन उत्सवाच्यावेळी कचरा उचलणारा कंत्राटदार नागरिकांना वेठीस धरत असून त्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या काळात कचरा उचलणे बंद केले आहे. काही महिन्यांपासून औषध फवारणीही बंद केली आहे. त्यामुळे शहरात दुर्गंधी साम्राज्य पसरले आहे. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार न घेतल्याने गणेशभक्तांना व जैन बांधवांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
प्रभाग समिती क्र. ५ अंतर्गत येणाºया जुन्या भिवंडीत घरोघरी गणेशमूर्तींची स्थापना केली असून या परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्याचप्रमाणे या प्रभागात अधिकाधिक जैन समाजाची मंदिरे असून या बांधवांनाही गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. प्रभाग समिती क्र. ५ मध्ये एकूण १७ प्रभाग येतात. त्यापैकी प्रभाग समिती क्र. ६ या प्रभागात महापौर जावेद दळवी व पालिकेच्या स्वच्छता समितीच्या उपसभापती सायली गजानन शेटे निवडून आल्या आहेत. तर महापौर दळवी हे स्वच्छतादूत आहेत. या प्रभागात असलेल्या कचराकुंडीत जंतुनाशक औषधांची फवारणी केलेली नाही. तसेच जंतुनाशक पावडरही न टाकल्याने गणेशभक्तांना दुर्गंधीतून गणेशमूर्ती घरी घेऊन जाव्या लागल्या.
प्रभाग समिंती पाचमध्ये सुमारे २२ घंटागाड्या सुरू असून त्यांना घरोघरी, इमारतीखाली व चौकात घंटा वाजवून कचरा गोळा करण्याचे निर्देश असताना ते हॉटेलातील कचरा गोळा करताना तेथेच घंटा वाजवून नागरिकांना तेथे कचरा आणून टाकण्यास सांगतात. तसेच महापालिकेच्या सुटीच्या दिवशी घंटागाड्या व कंत्राटदार कचरा गोळा करत नाहीत अशी तक्रार नागरिकांनी पालिकेकडे केली आहे. पण त्याची दखल घेतली जात नाही.

कंत्राटदाराचे बिल पालिकेकडे थकलेले आहे. त्यामुळे त्यांनी कचरा उचलणे बंद केले आहे. तर पालिकेच्या भांडारगृहात जंतुनाशके औषधे असून आरोग्य निरीक्षकांना वारंवार सांगूनही त्यांनी शहरात औषध फवारणी केली नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
- हेमंत गुळवी, आरोग्य अधिकारी
जैन समाजाचा पर्युषण पर्वाचे उपवास सुरू असून त्यासाठी जैन बांधव मंदिरात येतात. असे असताना रस्त्यावरील घाण व दुर्गंधीचा सामना जैन बांधवांना करावा लागतो. तर औषध फवारणी केली नसल्याने गणेशभक्तांनाही आपल्या गणेशमूर्ती घरोघरी नेताना दुर्गंधीचा सामना करावा लागला. या प्रकरणी आरोग्य अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी तक्रार पालिका आयुक्तांकडे केली आहे.
- अशोक जैन, अध्यक्ष, परिवर्तन मंच

Web Title: Badminton empire in Bhiwandi at An Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.