ठाण्याच्या चौपाटीवर ‘बाबा’ घोड्याचा बुडून मृत्यू, दोर पायात अडकल्याने दुर्घटना घडल्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:15 AM2017-12-21T01:15:03+5:302017-12-21T01:15:13+5:30

राबोडीतील शेख आणि गांधीनगरमधील फुलचंद जैस्वार तसेच अन्य एक जण असे तिघे जण आपापले घोडे धुण्याबरोबर त्यांना पोहण्यासाठी दुपारच्या सुमारास तलावपाळीच्या दत्त गणेश विसर्जन घाटावर घेऊन आले होते.

 'Baba' sinks on Than Chowpatty, death of accident | ठाण्याच्या चौपाटीवर ‘बाबा’ घोड्याचा बुडून मृत्यू, दोर पायात अडकल्याने दुर्घटना घडल्याचा अंदाज

ठाण्याच्या चौपाटीवर ‘बाबा’ घोड्याचा बुडून मृत्यू, दोर पायात अडकल्याने दुर्घटना घडल्याचा अंदाज

Next

ठाणे : मनाई असतानाही अंघोळीसाठी नेलेल्या तीन घोड्यांपैकी एका १६ वर्षीय घोड्याचा ठाण्याची चौपाटी असलेल्या मासुंदा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. ‘बाबा’ असे या मृत घोड्याचे नाव आहे. राबोडीतील युसूफ शेख यांनी मंगळवारीच हा घोडा कल्याणच्या एका व्यावसायिकाकडून कुटूंबाचे दागिने विकून खरेदी केला होता.अशाप्रकारे तलावात घोड्याचा बुडून मृत्यू होण्याची ठाण्यातील ही पहिलीच घटना असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राबोडीतील शेख आणि गांधीनगरमधील फुलचंद जैस्वार तसेच अन्य एक जण असे तिघे जण आपापले घोडे धुण्याबरोबर त्यांना पोहण्यासाठी दुपारच्या सुमारास तलावपाळीच्या दत्त गणेश विसर्जन घाटावर घेऊन आले होते. तिन्ही घोड्यांना पाण्यात उतरविल्यानंतर बाबा या घोड्याला बांधलेला दोर सुटून त्याच्या पायात अडकल्याने तो पाण्यात बुडू लागला. बाबा बुडताना पाहून इतर दोन्ही घोड्यांना बाहेर काढून त्याला वाचविण्यासाठी मालकासह १५ ते १६ जणांना धाव घेतली. बाबाला कसेबसे काही मिनीटात घाटाच्या पायरीवर पाण्यातून ओढून काढले.
मात्र,तोपर्यंत त्याच्या नाकातोंडात पाणी गेले होते. पायºयांवर आणल्यावर तो जिवंत होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पण,नाकातोंडात पाणी गेल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आहे. तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी बाबाचे शव भिवंडी येथील प्राण्याच्या रुग्णालयात पाठवले असून याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दागिने विकून घेतला होता घोडा
शेख यांनी पत्नीचे मंगळसूत्र आणि मुलांचे दागिने विकून खानदानी घोडागाडीचा व्यवसाय असल्याने त्यासाठी बाबा नामक घोड्याला ५० हजारांना विकत घेतले होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.
मनाई असतानाही घटना
ठाण्याची चौपाटी असलेल्या तलावात घोड्याचा बुडून मृत्यू झाल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. अशाप्रकारे मनाई असतानाही ही दुदैवी घटना घडल्याने चौपाटीची सुरक्षा वाºयावर असल्याचे बोलले जात आहे.
पूजाअर्चा केली जाणार होती
युसूफ याचे वडील हे पूर्वी ठाण्यात घोडागाडी चालवत होते.
त्यानंतर त्याचे भावंडेही हाच व्यवसाय करीत असल्याने त्यांनीही तलावपाळी येथे घोडागाडीसाठी घोडा खरेदी केला.
त्याला बुधवारी दुपारी धुवून संध्याकाळी त्याची पुजाअर्चा करून व्यवसाय सुरूकरणार होते, अशी माहिती
फुलचंद जैस्वार यांनी दिली.

Web Title:  'Baba' sinks on Than Chowpatty, death of accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे