आंबिवलीत पोलिसांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 02:29 AM2018-08-18T02:29:38+5:302018-08-18T02:29:41+5:30

आंबिवली येथील इराणी वस्तीत शुक्रवारी दुपारी आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या उल्हासनगर क्राइम ब्रँचच्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली.

 Amphibali police news | आंबिवलीत पोलिसांवर दगडफेक

आंबिवलीत पोलिसांवर दगडफेक

Next

कल्याण - आंबिवली येथील इराणी वस्तीत शुक्रवारी दुपारी आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या उल्हासनगर क्राइम ब्रँचच्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली. त्यात तीन पोलीस जखमी झाले. त्यांना उपचारार्थ उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिघांची नावे समजू शकलेली नाहीत. रात्री उशिरा खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
इराणी वस्तीतील जमावाकडून याआधीही अनेकवेळा पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
यासंदर्भात खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

Web Title:  Amphibali police news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.