'एअर स्ट्राइकचे फोटो काढायला वायुसेना लग्नाला गेली होती का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 12:11 AM2019-03-13T00:11:34+5:302019-03-13T07:02:46+5:30

एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारले यावरुन गेले काही दिवस उलटसुलट चर्चा सुरू आहे

Air Force had gone to the wedding to get air strikes photographs? | 'एअर स्ट्राइकचे फोटो काढायला वायुसेना लग्नाला गेली होती का?'

'एअर स्ट्राइकचे फोटो काढायला वायुसेना लग्नाला गेली होती का?'

googlenewsNext

डोंबिवली : सध्या वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे मागितले जात आहेत. फोटो काढायला वायुसेना लग्नाला गेली होती का? खरंतर, वायुसेनेने पुरावे मागणाऱ्यांना विमानाला बांधून सोबत नेले पाहिजे. तुम्हीच पाहा आणि फोटो काढा, असा टोला डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी लगावला आहे.

इतिहासकार पराग वैद्य लिखित ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध सत्य आणि विपर्यास’ या पुस्तकाचे प्रकाशन शास्त्री हॉलमध्ये शनिवारी झाले. यावेळी डॉ. शेवडे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, पुंडलिक पै आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. शेवडे म्हणाले, हे पुस्तक प्रश्न विचारायला उद्युक्त आणि विचार करायला लावणारे आहे. राम समजून घेण्यासाठी रावणाचा अभ्यास केला पाहिजे. तसेच हिटलर समजून घेण्यासाठी स्टॅलिन आणि चर्चिल यांचाही अभ्यास केला पाहिजे. पण, स्टॅलिन आणि चर्चिल हेच राम झाले. त्यामुळे हिटलरकडे कायम एकाच शेडमध्ये पाहिले गेले. आपल्याकडे काळे आणि पांढरे यामध्ये एखादी शेड असते, हे आपण पाहत नाही. हिटलर म्हटले की, आपण एकाच रितीने ऐकतो आणि बघतो. कारण, लहानपणापासून वाचत आलो आहे. मग, त्याला छेद देणारे काही वाचले की, तुम्ही हिंदुत्ववादी, तो उजव्या गटांचा तर तो असाच लिहिणार, असे आपण समजतो. दरम्यान, हिटलरवरील सर्व पुस्तकांतून प्रश्न विचारले जात नाहीत. प्रश्न केव्हा निर्माण होतात, जेव्हा आपण विचार करतो. पण, आपण पुस्तक वाचतच नाही. केवळ त्यावर नजर फिरवतो. म्हणून, आपल्याला प्रश्न पडत नाहीत.

Web Title: Air Force had gone to the wedding to get air strikes photographs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.