चंदेरी गडावर अडकलेल्या ट्रेकरची ३० तासांनंतर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 11:56 PM2018-10-29T23:56:37+5:302018-10-29T23:56:59+5:30

बदलापूर आणि वांगणीदरम्यान असलेल्या चंदेरी किल्ल्यावर अनेक ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात. गेल्या वर्षभरात ट्रेकिंगसाठी आलेले अनेक ट्रेकर्स रस्ता विसरल्याने जंगलात भरकटले आहेत.

After 30 hours of trekker stuck on Chanderi fort, | चंदेरी गडावर अडकलेल्या ट्रेकरची ३० तासांनंतर सुटका

चंदेरी गडावर अडकलेल्या ट्रेकरची ३० तासांनंतर सुटका

googlenewsNext

बदलापूर : बदलापूर आणि वांगणीदरम्यान असलेल्या चंदेरी किल्ल्यावर अनेक ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात. गेल्या वर्षभरात ट्रेकिंगसाठी आलेले अनेक ट्रेकर्स रस्ता विसरल्याने जंगलात भरकटले आहेत. असाच प्रकार रविवारी सायंकाळी घडला. बदलापूरहून चंदेरीवर गेलेला ट्रेकर्स जंगलात भरकटल्यावर तब्बल ३० तासांनंतर त्याला पनवेलमार्गे उतरवण्यात आले. ट्रेकर्स भरकटण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने या ठिकाणी ट्रेकर्सला बंदी घालण्याची मागणी पुढे येत आहे.

बदलापूरच्या चंदेरी किल्ल्यावर उदय रेड्डी हा ट्रेकर सकाळी ट्रेकिंगसाठी निघाला. मात्र, तो रस्ता भरकटल्याने चंदेरी किल्ल्याऐवजी शेजारी असलेल्या म्हैसमाळच्या सुळक्यावर पोहोचला. चंदेरी आणि म्हैसमाळ हे दोन्ही सुळके भिन्न आहेत. उतरण्याचा मार्ग न सापडल्याने तो वरच अडकून पडला. बराच शोध घेतल्यावर सकाळी त्याचा संपर्क झाला. मात्र, म्हैसमाळवरून त्याला खाली आणण्यासाठी बदलापूरऐवजी पनवेलचा मार्ग सोपा पडणार असल्याने पनवेलमधील ट्रेकर्सची मदत घेण्यात आली. निसर्गमित्र ट्रेकर्स ग्रुपच्या सदस्यांनी रेड्डी यांना तब्बल ३० तासांनंतर सुखरूप उतरवले.

दरम्यान, रविवारी दिवसभर आणि रात्रीदेखील त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न स्थानिक पोलिसांनी केला. विषारी सापांचा वावर असल्याने ही शोधमोहीम रात्री थांबवण्यात आली होती. सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. अखेर, सकाळी १०.३० वाजता त्याचा
शोध लागला.

यापूर्वीच्या घटना
१ आॅक्टोबरला ५८ वर्षीय राजेंद्र शिंदे हे ट्रेकिंगसाठी चंदेरी किल्ल्यावर भरकटले होते. त्यांची १८ तासांनंतर सुटका करण्यात आली होती.
२२ जुलै २०१८ रोजी एअर इंडियाचे सहा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मुसळधार पावसात अडकले होते. त्यांना २२ तासांनंतर सुखरूप उतरवले.

Web Title: After 30 hours of trekker stuck on Chanderi fort,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.