उंभार्लीतील ३७४ अतिक्रमणांवर वनविभागाची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 01:07 AM2018-12-08T01:07:11+5:302018-12-08T01:07:17+5:30

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बल्याणी, मौजे उंभार्ली परिसरात वन विभागाने धडक कारवाई करून तीन हेक्टरवरील ३७४ अनधिकृत बांधकामे शुक्रवारी तोडली.

Action on Forest Department on 374 encroachment in the U.P | उंभार्लीतील ३७४ अतिक्रमणांवर वनविभागाची धडक कारवाई

उंभार्लीतील ३७४ अतिक्रमणांवर वनविभागाची धडक कारवाई

Next

ठाणे / टिटवाळा : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बल्याणी, मौजे उंभार्ली परिसरात वन विभागाने धडक कारवाई करून तीन हेक्टरवरील ३७४ अनधिकृत बांधकामे शुक्रवारी तोडली. कल्याण परिसरासह अंबरनाथजवळील शेकडो एकरवरील वृक्षलागवडीस आग लावल्याच्या दुर्दैवी घटना नुकत्याच घडल्या आहेत. यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेसह निष्काळजीपणावर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर वनविभागाने त्यांच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईस प्रारंभ केल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे परिसरातील भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.
या धडक कारवाईस अनुसरून आमच्या टिटवाळा वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रामगावकर यांनी कल्याण परिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांना २६ नोव्हेंबर रोजी आदेश देऊन दोन दिवसांच्या आत घरे खाली करण्याची नोटीस बचावली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी वाघेरे यांनी तीन अधिकारी, वीस एसआरपी व २५० कर्मचारी, चार जेसीबी व एक पोकलेन असा भलामोठा फौज फाटा घेऊन उंभार्ली येथील वनजमिनीवरील अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली.
या कारवाईमुळे संबंधित कुटूंबांवर बेघर होण्याचा प्रसंग ओढवला आहे. वरिष्ठांच्या आदेशाने तालुक्यातील सर्वच वनजमिनीवरील अतिक्रमणांवर कारवाई करून त्या खुल्या करण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगितले जात आहे. मुरबाडचे सहायक वनसंरक्षक हिरवे, भामरे, कल्पना वाघेरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम पार पडली. या कारवाईमुळे वनक्षेत्रात वणवा पेटवण्याच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता वर्तविली जातेय.
>वन विभागाच्या २८ ए या संरक्षित जागेवरील अतिक्र मण केलेली ३७४ बांधकामे पाडून त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती उप वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. दोन दिवसांपासून शीळफाटाजवळील वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे, शेड्स आदी जमीनदोस्त करण्यात आली. याप्रमाणेच शुक्रवारी उंभार्ली परिसरातही धडक कारवाई केली. यासाठी पोलीस फौजफाटा तसेच शंभरावर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात केले. यामध्ये चाळी, दुकाने, शेड्स यांचा समावेश आहे. यावेळी सुमारे तीन हेक्टर जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याचा दावा वनविभागाने केला.

Web Title: Action on Forest Department on 374 encroachment in the U.P

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.