महाराष्टÑासह अनेक राज्यांमधील सराफांना गंडा घालणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:08 PM2019-01-28T23:08:19+5:302019-01-28T23:14:49+5:30

बोलण्यात गुंतवून महाराष्टÑासह अनेक राज्यातील सराफांना हातचलाखीद्वारे गंडा घालणा-या गुलाब शेख आणि घनश्याम राजपुत या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने नुकतीच अटक केली आहे.

Accused arrested who cheated to goldsmith of multistates | महाराष्टÑासह अनेक राज्यांमधील सराफांना गंडा घालणाऱ्या दोघांना अटक

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी

Next
ठळक मुद्देूबोलण्यात गुंतवून लक्ष वेधायचेठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी सोन्याचे दागिने आणि हिरेही हस्तगत

ठाणे: महाराष्टÑासह दिल्ली, राजस्थान तसेच उत्तरप्रदेशातील सराफांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने लुबाडणा-या गुलाब अब्बास शेख (४५) आणि घनश्याम राजपुत (२७) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन हजार ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १० ग्रॅमचे हिरे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सराफाच्या दुकानदारांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि हिरे लुबाडणारी एक आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे घाटकोपर येथील पंखेशा बाब दर्ग्याच्या मागे सापळा रचून एसआरए बिल्डींग मधील १००३ आणि १३०४ या सदनिकांमध्ये छापा टाकून गुलाब आणि घनश्याम या दोघांना १९ जानेवारी रोजी अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना २५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडीच्या कालावधीत या दोघांनी लुटीसाठी वापरलेली ६० हजारांची केटीएम मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. तमसेच त्यांनी दिल्ली, राज्यस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्टÑासह अनेक राज्यांमध्ये दहा अशा प्रकारचे गुन्हे करुन दोन हजार ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ९.७५ ग्रॅम वजनाचे हिरे चोरल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून आणखीही अशा प्रकारचे गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु-हाडे, संदीप बागूल, समीर अहिरराव आदींचे पथक याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Accused arrested who cheated to goldsmith of multistates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.