दुसऱ्या फेरीचे प्रवेश खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 04:17 AM2018-05-19T04:17:17+5:302018-05-19T04:17:17+5:30

शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टककयांमधील दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी सोडत काढणे अपेक्षित आहे.

Access to the second round will be allowed | दुसऱ्या फेरीचे प्रवेश खोळंबले

दुसऱ्या फेरीचे प्रवेश खोळंबले

Next

सुरेश लोखंडे
ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टककयांमधील दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी सोडत काढणे अपेक्षित आहे. मात्र, ठाणे येथील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने पहिल्या फेरीतील २६ विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश दिला नाही. यावर योग्य तो तोडगा निघेपर्यंत दुसºया फेरीचे आरटीई प्रवेश खोळंबले आहेत. वेळेत आॅनलाइन अर्ज करूनही प्रवेशासाठी वेठीस धरले जात असल्यामुळे जिल्ह्यातील पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये २५ टककयांमधील १६ हजार ५४६ प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. यातील पाच हजार ७०२ विद्यार्थी पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी निवडले. मात्र, त्यातील तीन हजार ८७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. १५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश रिजेक्ट करण्यात आले, तर उर्वरित एक हजार ६४६ विद्यार्थ्यांनी दिलेल्या शाळांमध्ये जाऊन प्रवेश घेतलेला नसल्याचे आढळून आले. यातील येथील पाचपाखाडी परिसरातील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने सुमारे २६ विद्यार्थ्यांना आजपर्यंतही प्रवेश दिले नाही. या विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय दिल्याशिवाय दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी काढली जाणार नसल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
आरटीई या कायद्याखाली देण्यात येत असलेल्या २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी या सरस्वती शाळेत केवळ पाच जागा राखीव असल्याचे शाळेचे म्हणणे आहे. परंतु, २८ जागा आरक्षित असल्याची नोंद शाळा प्रशासनाने आधीच केली, त्यानुसार लॉटरी सोडतद्वारे या शाळेसाठी सुमारे २६ विद्यार्थ्यांची निवड केली. त्यांना शाळेने अद्यापही प्रवेश दिला नाही. शुक्रवारी उपशिक्षणाधिकाºयांकडे सुनावणी झाली. त्यावर शाळा व्यवस्थापन आता काय निर्णय घेणार, त्यानंतर दुसºया फेरीच्या प्रवेशाची तयारी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाºया खाजगी शाळांमधील केजी ते पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी आरटीईच्या १६ हजार ५४६ जागा आरक्षित आहेत. यासाठी पालकांनी १० हजार ८३९ अर्ज आॅनलाइन दाखल केले. प्रवेश क्षमतेपेक्षा प्राप्त अर्ज कमी आहेत. तरीदेखील दुसºया फेरीस विलंब होत असल्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
>१६ हजारपैकी ५,७०२ प्रवेश
जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये १६, ५४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश आरक्षित आहेत. यापैकी केजीच्या तीन हजार ४८० विद्यार्थ्यांना, तर पहिलीसाठी १३ हजार ६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश आरटीईअंतर्गत आरक्षित ठेवले.
सरस्वती शाळेमुळे फटका : ठाणे येथील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने पहिल्या फेरीतील २६ विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश दिला नाही. यावर योग्य तो तोडगा निघेपर्यंत दुसºया फेरीचे आरटीई प्रवेश खोळंबले आहेत.
आजपर्यंत शाळांमध्ये झालेले प्रवेश
शहर शाळा निवड प्रवेश रिजेक्ट
ठाणे मनपा-१ ८० ३८६ २६८ १३
ठाणे मनपा-२ ६३ ७५० ५१२ १३
अंबरनाथ ५० ३७८ २०१ ०१
केडीएमसी ७७ ६७७ ४७३ १६
कल्याण ग्रामीण ४६ १७० १२७ ०९
भिवंडी मनपा ३२ ८९१ ६२० ३७
भिवंडी ग्रामीण २९ ३१ २२ ०९
मीरा-भार्इंदर ९४ २८ ०८ ०३
नवी मुंबई १०४ १८६० १२७७ ५४०
उल्हासनगर १९ ३१३ २१३ ०४
मुरबाड १५ ०७ ०७ ००
शहापूर ३१ २११ १४७ ०७

Web Title: Access to the second round will be allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.