८८२ मालमत्ता जप्त, ठामपाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 01:08 AM2018-12-08T01:08:36+5:302018-12-08T01:08:43+5:30

ठाणे महापालिकेने मालमत्ताकर व पाणीकर वसुलीची मोहीम तीव्र केली असून देयके न भरणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करून आतापर्यंत ८८२ मालमत्ता जप्त केल्या

882 assets seized, action taken | ८८२ मालमत्ता जप्त, ठामपाची कारवाई

८८२ मालमत्ता जप्त, ठामपाची कारवाई

Next

ठाणे : ठाणे महापालिकेने मालमत्ताकर व पाणीकर वसुलीची मोहीम तीव्र केली असून देयके न भरणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करून आतापर्यंत ८८२ मालमत्ता जप्त केल्या असून सुमारे १५९ मालमत्ता सील केल्या आहेत. शिवाय ९८ नळजोडण्याही खंडित केल्या आहेत. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मालमत्ताकर आणि पाणीकराची थकबाकीची रक्कम तत्काळ भरावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापलिका प्रभागनिहाय ही कारवाई करीत आहे. नागरिकांना मालमत्ताकर जमा करणे सोईचे व्हावे या दृष्टीकोनातून १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत महापालिकेची सर्व कर संकलन केंद्र सार्वजनिक सुटीच्या दिवशी (२१ मार्च, २०१९ वगळून) पूर्णवेळ तसेच सर्व रविवारी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत कार्यान्वीत राहणार आहेत. तसेच ज्या गृहसंकुलात, उद्योग संकुलात मालमत्ताकराची सदनिका, युनिटनिहाय स्वतंत्र बिले दिली जातात, अशा गृहसंकुल, उद्योग संकुलात मालमत्ता करवसुलीचा कॅम्प संबंधितांच्या विनंतीनुसार आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी प्रभाग कार्यालयाकडील मालमत्ताकर विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही पालिकेने केले आहे.
>२०१८-१९ या आर्थिक वर्षात कराची रक्कम महापालिकेकडे जमा केलेली नाही, अशा थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आढावा बैठकीत दिले होते. पालिका आयुक्तांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रीया पालिकेने सुरु केली आहे. थकबाकीदारांनी याचा धसका घेतला आहे.महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर आॅनलाईन मालमत्ताकर भरण्याची सुविधा आहे. मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले.

Web Title: 882 assets seized, action taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.