हरिश्चंद्रगड उतरण्यास 'त्या' ट्रेकर्सकडून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 11:20 AM2018-11-26T11:20:32+5:302018-11-26T11:35:24+5:30

कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे २० जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले असता तेथून पुढे दीड किलोमीटर कोकणकडा येथे १00 फूट खाली हे सर्व ट्रेकर्स रविवारी (25 नोव्हेंबर) अडकले होते.

20 trekkers in kalyan stuck at harishchandragad | हरिश्चंद्रगड उतरण्यास 'त्या' ट्रेकर्सकडून सुरुवात

हरिश्चंद्रगड उतरण्यास 'त्या' ट्रेकर्सकडून सुरुवात

Next
ठळक मुद्देहरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगदरम्यान अडकून पडलेल्या कल्याणच्या २० ट्रेकर्सनी गड उतरायला सुरुवात केली आहे. कोकणकड्याचा ५०० मीटर्सचा सुळका उतरायला अडकलेल्या ट्रेकर्सने सुरुवात केली आहे.किमान ६ ते ७ तासांचा कालावधी लागू शकतो.

अझहर शेख

नाशिक - कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे २० जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले असता तेथून पुढे दीड किलोमीटर कोकणकडा येथे १00 फूट खाली हे सर्व ट्रेकर्स रविवारी (25 नोव्हेंबर) अडकले होते. हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगदरम्यान रॅपलिंग करत असताना अंधार झाल्यामुळे वाट हरवून तसेच रॅपलिंगला धोका निर्माण झाल्याने अडकून पडलेल्या कल्याणच्या 'द वेस्टर्न ट्रेकर्स' या ग्रूपच्या २० ट्रेकर्सला काळोखात गडावर बोचऱ्या थंडीचा सामना करत रात्र काढावी लागली. सूर्योदय झाल्यानंतर त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांच्यापर्यंत 'न्याहारी'चे खाद्यपदार्थ, पाणी, ग्लुकोज, चहा, बिस्किटे पोहोचविली. त्यानंतर त्यांनी सोबत असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षित ट्रेकर्स च्या मदतीने गड उतरण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान,  त्यांच्या मदतीसाठी इतर ट्रेकर्स आणि प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. बचाव मोहिम पुन्हा सुरु करण्यात आली आहे. हरिश्चंद्र गडावरील कोकणकड्याचा ५०० मीटर्सचा सुळका उतरायला या अडकलेल्या ट्रेकर्सनी सुरुवात केल्याचे समजते. हा सुळका यशस्वीरित्या उतरल्यानंतर त्यांना आणखी एक ३०० मीटर्सचा सुळका उतरावा लागणार आहे. त्यानंतर पुढे अंदाजे ३ तास पायी चालून त्यांना आपल्या बेस कँप पर्यंत पोहचता येणार आहे. यासाठी त्यांना पुढील किमान ६ ते ७ तासांचा कालावधी लागू शकतो, असे स्थानिक गाईडने सांगितले. सगळे ट्रेकर्स सुरक्षित आहे.



 

Web Title: 20 trekkers in kalyan stuck at harishchandragad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक