मोबाईलवर पॉर्न पाहण्याच्या आहारी आहात? त्यावर उपाय शोधताय? तर हे वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 09:45 PM2017-11-17T21:45:26+5:302017-11-17T21:45:41+5:30

आज लक्षावधी लोक पॉर्नोग्राफी व्यसनाला बळी पडलेले आहेत आणि लक्षावधी नाही, तर कोट्यवधी लोक बळी पडण्यासाठी विंगेत उभे आहेत.

Watching porn on mobile? Looking for the solution? So this is a test | मोबाईलवर पॉर्न पाहण्याच्या आहारी आहात? त्यावर उपाय शोधताय? तर हे वाचाच

मोबाईलवर पॉर्न पाहण्याच्या आहारी आहात? त्यावर उपाय शोधताय? तर हे वाचाच

Next

बनारस - पॉर्नोग्राफी हे अगदी अलीकडचे, म्हणजे गेल्या १०-१५ वर्षांमधले, व्यसन आहे; पण आज लक्षावधी लोक या व्यसनाला बळी पडलेले आहेत आणि लक्षावधी नाही, तर कोट्यवधी लोक बळी पडण्यासाठी विंगेत उभे आहेत. पोर्नसाईटच्या आहारी गेलेल्यांची सुटका करण्यासाठी एक खास अ‍ॅप आले आहे. जर तुम्ही मोबाईलवर पोर्नसाईट उघडली तर आपोआप धार्मिक गाणी वाजण्यास सुरुवात होईल. या अ‍ॅपच नाव आहे हर-हर महादेव..

बनारस हिंदू विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (आयएमएस-बी एच यू) च्या एका न्युरोलॉजिस्टने त्याच्या टीमच्या मदतीने एक अ‍ॅप बनवला आहे. या अ‍ॅपचं वैशिष्ट्य म्हणजे तो पोर्नोग्राफिक असलेल्या साइट्स ब्लॉक करेल. या अ‍ॅपचं नाव आहे 'हर-हर महादेव' अ‍ॅप. वाढत्या सायबर क्राइम आणि बलात्काराचे गुन्हे पाहता हा अ‍ॅप बनवण्यात आला आहे.
पॉर्नसाईट ओपन करताच त्यावर धार्मिक गाणी वाजली जातील.या अ‍ॅपला डाऊनलोड आणि त्याचं फोनमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर कोणी इंटरनेटवर पॉर्न साईट्स ओपन केल्या तर आपोआपच धार्मिक गाणी प्ले होतील. या टीमने वेबसाईट ब्लॉकर आणि इंटरनेट फिल्टरिंग सेवा या अ‍ॅपद्वारे विकसित केली आहे.

3800 साईट्सला हा अ‍ॅप करणार ब्लॉक
हर-हर महादेव हा अ‍ॅप बनवण्यासाठी 6 महिने लागले. 3800 पोर्नच्या साईट्सला हा अ‍ॅप ब्लॉक करू शकतो. हो आता या अ‍ॅपचं उद्दिष्ट्य तर चांगलं आहे पण खरंच या अ‍ॅपने सायबर क्राइम आणि बलात्कारासारखे गुन्हे थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Web Title: Watching porn on mobile? Looking for the solution? So this is a test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.