गेमर्सची चांदी! 1200 पेक्षा जास्त गेम्स एकाच अ‍ॅपमध्ये; Vodafone Idea ने सादर केली Vi Gaming सेवा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 06:54 PM2022-03-16T18:54:28+5:302022-03-16T18:54:42+5:30

Vodafone Idea नं आपल्या युजर्ससाठी नवीन गेमिंग सर्व्हिस सुरु केली आहे. यासाठी कंपनी Nazara Technologies सोबत भागेदारी केली आहे.  

Vodafone idea Launched vi gaming with nazara technologies | गेमर्सची चांदी! 1200 पेक्षा जास्त गेम्स एकाच अ‍ॅपमध्ये; Vodafone Idea ने सादर केली Vi Gaming सेवा 

गेमर्सची चांदी! 1200 पेक्षा जास्त गेम्स एकाच अ‍ॅपमध्ये; Vodafone Idea ने सादर केली Vi Gaming सेवा 

Next

Vodafone Idea (Vi) नं आपल्या गेमिंग लवर्स युजर्ससाठी एक नवीन सेवा सादर केली आहे. कंपनीनं Nazara Technologies सोबत भागेदारी करून Vi Games app च्या माध्यमातून शेकडो मजेदार गेम्स उपलब्ध करवून दिले आहेत. हे गेम्स Vi च्या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून अ‍ॅक्सेस करता येतील. यात अ‍ॅक्शन, अ‍ॅडवेंचर, आर्केड, कॅजुअल, फन, पझल, रेसिंग, स्पोर्ट्स, एजुकेशन आणि स्ट्रॅटेजी अशा दहा कॅटेगरीमधील 1200 पेक्षा जास्त अँड्रॉइड आणि एचटीएमएल5 आधारित मोबाईल गेम्स आहेत.  

मोबाईल गेमर्सच्या संख्येत वाढ 

वोडाफोन आयडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अवनीश खोसला यांनी सांगितलं, “आम्ही भारतात गेमिंग इंडस्ट्रीमध्ये होणारी वाढ पाहत आहोत, कारण इथे Mobile Games खेळणाऱ्या गेमर्सच्या संख्येत खूप वेगाने वाढ होत आहे. यातील 95 टक्क्यांपेक्षा जास्त युजर्स मोबाईल डिवाइसमध्ये वेगवेगळे गेम्स खेळायला आवडतं.”  

Vi Games प्लॅन्स  

विआय गेम्स सब्सक्रिप्शन पद्धतीनं युजर्ससाठी उपलब्ध होतील. यात फ्री गेम्ससह प्लॅटिनम आणि गोल्ड कॅटेगरीजचा देखील समावेश आहे. विआय गेम्स अ‍ॅप्लिकेशनमध्ये 250 पेक्षा जास्त फ्री टायटल्स असतील. प्लॅटिनम गेम्स कॅटेगरीमध्ये डाउनलोडनुसार पेमेंट करावं लागेल. यात Postpaid Plan साठी 25 रुपयांचा पास असेल तर प्रीपेड ग्राहकांना 26 रुपयांचा पास घ्यावा लागेल. 

गोल्ड कॅटेगरी सर्वात मोठी असेल, ज्यात पोस्टपेड ग्राहकांसाठी 50 रुपयांमध्ये 30 गेम आणि प्रीपेड युजर्ससाठी 56 रुपयांमध्ये 30 गेम देण्यात येतील. 499 रुपये आणि त्यापेक्षा जास्त प्लॅन असणाऱ्या पोस्टपेड ग्राहकांना दर महिन्याला 5 गेम्स फ्री मिळतील. या कॅटेगरीचे सर्व गेम 30 दिवस डाउनलोड करण्यासाठी आणि खेळण्यासाठी उपलब्ध होतील.  

नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संस्थापक व समूह व्यवस्थापकीय संचालक श्री नितीश मीटरसेन यांनी सांगितले, “भारतामध्ये गेमिंग हे मनोरंजनाचे भवितव्य आहे इतकेच नव्हे तर, दर दिवशी आपापल्या मोबाईल फोन्सवर गेम्स खेळणाऱ्या लाखो भारतीयांसाठी मनोरंजनाचा महत्त्वाचा मार्ग बनला आहे. गेमिंग कन्टेन्ट, ई-स्पोर्ट्स आणि संवादात्मक मनोरंजनाचा संपूर्ण पोर्टफोलिओ वीच्या युजर्सच्या प्रचंड मोठ्या संख्येला उपलब्ध करवून देण्यासाठी वी सोबत भागीदारी करताना नजाराला अतिशय आनंद होत आहे.” 

Web Title: Vodafone idea Launched vi gaming with nazara technologies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.