विवो वाय71 आ0यच्या या व्हेरियंटचे मूल्य झाले कमी

By शेखर पाटील | Published: August 7, 2018 07:25 AM2018-08-07T07:25:44+5:302018-08-07T07:25:55+5:30

विवो कंपनीने वाय७१आय या स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅमच्या व्हेरियंटच्या मूल्यात कपात करण्याचे संकेत दिले आहेत.

Vivo v 71 The value of this variant is reduced | विवो वाय71 आ0यच्या या व्हेरियंटचे मूल्य झाले कमी

विवो वाय71 आ0यच्या या व्हेरियंटचे मूल्य झाले कमी

googlenewsNext

विवो कंपनीने वाय७१आय या स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅमच्या व्हेरियंटच्या मूल्यात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. विवो कंपनीने अलीकडेच वाय७१आय हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये लाँच केला होता. यातील २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेज तर ४ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आलेले आहे. यातील ४ जीबी रॅमच्या व्हेरियंटचे मूल्य १२,९९० रूपये इतकी होती. तथापि, यात आता एक हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे आता हा स्मार्टफोन ग्राहकांना ११,९९० रूपयात खरेदी करता येणार आहे. पहिल्यांदा ही दर कपात ऑफलाईन बाजारपेठेत प्रदान करण्यात आलेली आहे. लवकरच विविध शॉपींग पोर्टलवरूनही याला लागू करण्यात येईल अशी शक्यता आहे.

विवो वाय७१आय या मॉडेलमधील डिस्प्ले हा ६ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन ४२५ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. एफ/२.० अपर्चर आणि एलईडी फ्लॅशने युक्त असणारा यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. याचे अपर्चर एफ/२.२ आहे. तसेच यामध्ये एआय ब्युटी हे विशेष फिचर प्रदान करण्यात आले आहे.  

विवो वाय७१आय हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या प्रणालीवर चालणारे असून यावर विवो कंपनीचा फनटच ओएस ४.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, ओटीजी आदी फिचर्स आहेत. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. यातील बॅटरी ३,३६० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.  

Web Title: Vivo v 71 The value of this variant is reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.