क्लियर फोटो काढण्यासाठी 108MP चा कॅमेरा; याच आठवड्यात येतोय Samsung Galaxy M53  

By सिद्धेश जाधव | Published: April 18, 2022 02:32 PM2022-04-18T14:32:17+5:302022-04-18T14:32:39+5:30

Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन भारतात 108MP Camera, 120Hz Display आणि Auto Data Switching टेक्नॉलॉजीसह सादर केला जणारा आहे.

Samsung Galaxy M53 5G Phone India Launch 22 April With 108MP Camera  | क्लियर फोटो काढण्यासाठी 108MP चा कॅमेरा; याच आठवड्यात येतोय Samsung Galaxy M53  

क्लियर फोटो काढण्यासाठी 108MP चा कॅमेरा; याच आठवड्यात येतोय Samsung Galaxy M53  

Next

Samsung गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात आपल्या ‘एम’ चा नवा स्मार्टफोन सादर केला होता. परंतु तेव्हा कंपनीनं या स्मार्टफोनची किंमत सांगितली नव्हती. आता तोच Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. विशेष म्हणजे 108MP Camera, 120Hz Display आणि Auto Data Switching टेक्नॉलॉजी असलेला हा हँडसेट याच आठवड्यात भारतीयांच्या भेटला येणार आहे.  

India Launch 

Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन याच आठवड्यात 22 एप्रिलला भारतात लाँच केला जाईल, अशी माहिती सॅमसंग इंडियानं दिली आहे. 22 तारखेला दुपारी 12 वाजता या हँडसेट लाँच इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. जो तुम्ही कंपनीच्या  युट्युब चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट बघू शकता. अ‍ॅमेझॉन इंडियावर Samsung Galaxy M53 चं प्रोडक्ट पेज लाईव करण्यात आलं आहे, त्यामुळे तिथूनच या फोनची विक्री करण्यात येईल.  

Samsung Galaxy M53 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy M53 5G चा कॅमेरा सेगमेंट खूप महत्वाचा आहे. मागे क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. सोबत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचाच डेप्थ सेन्सर मिळतो. फोनच्या फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर कंपनीनं दिला आहे.  

सॅमसंग एम53 5जी मध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह मिळतो. फोन अँड्रॉइड 12 बेस्ड One UI 4.1 वर चालतो. यातील चिपसेटचं समजलं नाही पण ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येते. बेसिक कनेक्टिव्हिटीसह साईड फिंगरप्रिंटची सुरक्षा मिळते. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते.   

Web Title: Samsung Galaxy M53 5G Phone India Launch 22 April With 108MP Camera 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.