सावधान! ATM मशिनजवळ केलेल्या 'या' एका चुकीमुळे व्हाल कंगाल; 'असा' करा बचाव अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 12:38 PM2024-04-05T12:38:51+5:302024-04-05T12:39:33+5:30

महिला एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती, मात्र तिचे कार्ड एटीएममध्ये अडकले. त्या एटीएममध्ये एकही गार्ड नव्हता.

how atm scam loot your money from bank account how to stay safe | सावधान! ATM मशिनजवळ केलेल्या 'या' एका चुकीमुळे व्हाल कंगाल; 'असा' करा बचाव अन्यथा...

सावधान! ATM मशिनजवळ केलेल्या 'या' एका चुकीमुळे व्हाल कंगाल; 'असा' करा बचाव अन्यथा...

लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी स्कॅमर्स वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरतात. असंच काहीसं नुकतंच एका महिलेसोबत घडलं, जी स्कॅमर्सच्या एटीएम स्कॅममध्ये अडकली होती. महिला दिल्लीतील मयूर विहार भागातील रहिवासी आहे. ती एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेली होती. यावेळी तिचे कार्ड एटीएममध्ये अडकले. यानंतर पीडितेने हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला असता तिची फसवणूक झाली. स्कॅमर्सने तिच्या 21 हजारांवर डल्ला मारला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया.

या महिन्याच्या सुरुवातीला ही घटना घडली होती. महिला एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती, मात्र तिचे कार्ड एटीएममध्ये अडकले. त्या एटीएममध्ये एकही गार्ड नव्हता. त्यानंतर तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलेल्या माहितीत सांगितलं की, तिला एटीएमच्या भिंतीवर एक नंबर सापडला.

एटीएमबाहेर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा एजंटचा कॉन्टॅक्ट नंबर असल्याचं सांगितलं. यानंतर, महिलेने तो नंबर डायल केला, त्यानंतर बनावट एजंटने तिला रिमोटली एटीएम बंद करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून ती तिचं कार्ड बाहेर काढू शकेल. यासाठी स्कॅमरने तिला काही स्टेप्स फॉलो करण्यास सांगितलं.

बनावट एजंटने दिलेल्या स्टेप्स फॉलो करूनही तिचं एटीएम कार्ड बाहेर आलं नाही. एजंटने तिला आश्वासन दिलं की दुसऱ्या दिवशी इंजिनिअर्स एटीएममधून तिचे कार्ड काढून तिला परत करतील. यानंतर महिलेच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचं आढळून आले आणि एटीएममध्ये तिचं कार्डही नव्हतं. महिलेने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

'या' गोष्टी ठेवा लक्षात

- भिंतीवर लिहिलेल्या फोन नंबरवर कधीही विश्वास ठेवू नये. 
- एटीएम मशिनमध्ये तुमचं कार्ड अडकलं तर तुम्ही थेट तुमच्या बँकेशी संपर्क साधावा. 
-ंयासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून नंबर मिळवू शकता.
- तुमचा एटीएम कार्ड पिन कोणाशीही शेअर करू नका.
- जर कोणी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करण्यास सांगत असेल तर विचार न करता त्यांचे अनुसरण करू नका. 
- तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास, त्याबद्दल ताबडतोब तुमच्या बँकेला कळवा.
- एटीएम फसवणुकीविरोधात पोलिसात तक्रार करा.
 

Web Title: how atm scam loot your money from bank account how to stay safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.