दातावरील सेन्सर ठेवणार भोजनावर लक्ष!

By शेखर पाटील | Published: March 26, 2018 06:12 PM2018-03-26T18:12:02+5:302018-03-26T18:12:02+5:30

विविध खाद्य पदार्थांमधील पोषक घटकांचे मापन करणार्‍या प्रणालीची आवश्यकता आहे.

The donor sensor will focus on the meal | दातावरील सेन्सर ठेवणार भोजनावर लक्ष!

दातावरील सेन्सर ठेवणार भोजनावर लक्ष!

मुंबई: तंत्रज्ञांच्या एका चमूने आता चक्क दातावर लावता येणारे पिटुकले सेन्सर तयार केले असून याच्या मदतीने आपण खात असणार्‍या भोजनातील विविध तत्वांवर लक्ष ठेवता येणार आहे.

सध्या जगभरात पोषक आहाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. आपण नेमके काय खातो याची अचूक माहिती मिळावी अशी बहुतांश लोकांची इच्छा असते. मात्र, हे काम वाटते तितके सोपे नाही. यासाठी विविध खाद्य पदार्थांमधील पोषक घटकांचे मापन करणार्‍या प्रणालीची आवश्यकता आहे. आणि सर्व खाद्य पदार्थांचे एकचदा मापन जवळपास अशक्य असल्याची बाब उघड आहे. मात्र टफ्ट विद्यापीठातील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या एका चमूने यावर अफलातून उपाय शोधून काढला आहे. या तंत्रज्ञांनी चक्क दातावर लावता येणारे चिमुकले सेन्सर तयार केले आहे. याचे आकारमान फक्त २ मीमी बाय २ मीमी इतके आहे. कोणत्याही व्यक्तीच्या समोरीला दातावर याला लावता येते. याचा रंग सोनेरी आहे. हे सेन्सर आकाराने अतिशय लहान असले तरी याची चित्रस्तरीय रचना आहे. यातील मधला भाग हा बाया रिस्पॉन्सीव्ह या प्रकारचा असून विविध पोषक द्रव्यांचे तातडीने विश्‍लेषण करण्यास सक्षम आहे. तर बाहेरील दोन्ही भाग हे सोनेरी रंगाचे असून एकत्रितपणे अँटेनाचे काम करतात. अर्थात मधल्या थरातून मिळालेली माहिती वायरलेस पध्दतीने पाठविण्याचे काम ते करतात.

हे सेन्सर दातावर लावलेला व्यक्ती कोणताही पदार्थ खात असतांना त्यातील घटकांचे विश्‍लेषण करण्यात येते. यात त्या पदार्थातील शर्करा, मीठ, अल्कोहोल आदींच्या प्रमाणाची माहिती अगदी रिअल टाईम या पध्दतीत जमा करून ती वायरलेस पध्दतीने याच्याशी कनेक्ट असणार्‍या स्मार्टफोन वा अन्य उपकरणाकडे पाठविली जाते. हे करत असतांना या सेन्सरचा रंग बदलत जातो व यातील बदलाची माहिती लागलीच देण्यात येते. म्हणजे कुणीही व्यक्ती एखाद्या खाद्य पदार्थाचा घास घेत असतांनाच त्याला त्यातील विविध घटकांची माहिती मिळू शकते. म्हणजे एखादी डीश ही आरोग्याला घातक असल्याचेही त्याला तातडीने लक्षात येऊ शकते. या संशोधनाबाबतची माहिती अ‍ॅडव्हान्स मटेरिलयन्स या नियतकालीकाच्या ताज्या अंकामध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
 

Web Title: The donor sensor will focus on the meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.