BSNL ची धमाका ऑफर, 999 मध्ये एक वर्षांसाठी इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 10:20 AM2018-02-15T10:20:21+5:302018-02-15T10:24:03+5:30

बीएसएनएलने एक धमाकेदार ऑफर आणली असून युजर्सना 999 रुपयांत एक वर्षांसाठी दिवसाला 1 जीबी डाटा देत आहे

BSNL offers Internet and calling facility for one year in 999 | BSNL ची धमाका ऑफर, 999 मध्ये एक वर्षांसाठी इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा

BSNL ची धमाका ऑफर, 999 मध्ये एक वर्षांसाठी इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा

Next

मुंबई - बीएसएनएलने एक धमाकेदार ऑफर आणली असून युजर्सना 999 रुपयांत एक वर्षांसाठी दिवसाला 1 जीबी डाटा देत आहे. याशिवाय या प्लानमध्ये सहा महिन्यांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात येत आहे. रिचार्ज केल्यानंतर 181 दिवसांसाठी युजरला अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस करण्याची सुविधा मिळणार आहे. यानंतर मात्र कॉलिंग आणि एसएमएससाठी चार्ज लागेल. इंटरनेटची सुविधा मात्र एक वर्षांसाठी असणार आहे. 

काही दिवसांपुर्वी BSNL ने आपल्या युजर्ससाठी KOOL ऑफर आणली होती. ही ऑफर कंपनीच्या प्रीपेड युजर्ससाठी होती. एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियाकडून देण्यात येणा-या ऑफरमध्ये डाटा लिमिट आहे. मात्र बीएसएनएलच्या या प्लानची खास गोष्ट म्हणजे त्यात डाटाची काही लिमिट नाही. या प्लानमध्ये अनलिमिटेड डाटा मिळत आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सुविधादेखील मिळत आहे. तसंच 100 एसएमएस देखील मिळणार आहेत. 1099 चा हा प्लान हा असणार आहे. विशेष म्हणजे बीएसएनएलच्या सर्व प्लानमध्ये 3G डाटा मिळत आहे. हा प्लान 84 दिवसांसाठी वैध आहे.  

याशिवाय बीएसएनएलने रिचार्जवर 50 टक्के कॅशबॅक देण्याचीही ऑफरही दिली आहे. या ऑफर अंतर्गत 100 रुपयांच्या रिचार्जवर 50 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. या ऑफरमध्ये जास्तीत जास्त मिळणारा कॅशबॅक 75 रुपये आहे. फोन पे वरुन रिचार्ज केला तरच ही ऑफर लागू आहे. 

ही ऑफर फक्त ऑनलाइन रिचार्जवर उपलब्ध आहे. बीएसएनएलने काही दिवसांपुर्वी 186, 187, 349, 429, 485 आणि 666 रुपयांच्या प्लानमधील डाटा लिमिट वाढवली होती. यासोबतच या सर्व प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मोफत दिली जात आहे. याशिवाय 100 मेसेजही दिले जात आहे. 186 आणि 187 रुपयांच्या प्लानमध्ये युजरला 28 दिवसांसाठी 1 GB डाटा वापरायला मिळत आहे. 

Web Title: BSNL offers Internet and calling facility for one year in 999

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.