BSNL ग्राहकांना मोठा धक्का, कंपनीने 4 स्पेशल टॅरिफ व्हाउचर केले बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 08:27 PM2023-02-27T20:27:50+5:302023-02-27T20:29:02+5:30

विशेष म्हणजे हे प्लॅन्स लोकप्रिय नव्हते आणि कंपनीला त्याचा फायदा होत नव्हता.

BSNL Discontinues Four Stvs Including Rs 71 Rs 104 Rs 135 Rs 395 Airtel Effect Launces Festive Dhamaka Offer | BSNL ग्राहकांना मोठा धक्का, कंपनीने 4 स्पेशल टॅरिफ व्हाउचर केले बंद 

BSNL ग्राहकांना मोठा धक्का, कंपनीने 4 स्पेशल टॅरिफ व्हाउचर केले बंद 

googlenewsNext

नवी दिल्ली : खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्याच्या उद्देशाने बीएसएनएलही (BSNL) आपल्या योजनेत बदल करत आहे. बीएसएनएलने चार स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STVs) बंद केले आहेत. कंपनीने सध्या यासंदर्भात घोषणा केलेली नाही, परंतु कंपनीच्या वेबसाइटवरून 71 रुपये,  104 रुपये,  135 रुपये आणि 395 रुपयांचे प्लॅन्स हटवले आहेत. विशेष म्हणजे हे प्लॅन्स लोकप्रिय नव्हते आणि कंपनीला त्याचा फायदा होत नव्हता. दरम्यान, बीएसएनएलच्या हटवलेल्या एसटीव्हींबद्दल जाणून घ्या...

71 रुपयांचा BSNL स्पेशल टॅरिफ व्हाउचर
71 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये 30 पैसे प्रति मिनिट दराने पैसे द्यावे लागतात. म्हणजे यात मोफत कॉल आणि मेसेज मिळत नाहीत. याशिवाय ग्राहकांना 30 दिवस वापरण्यासाठी 20 रुपये देखील मिळतात. मात्र, हा पॅक डेटा हवा असलेल्या ग्राहकांसाठी नाही आहे.

104 रुपयांचा BSNL स्पेशल टॅरिफ व्हाउचर
104 रुपयांचा BSNL पॅक 18 दिवसांसाठी सर्व फायदे ऑफर केले जातात. याशिवाय, हा पॅक डिस्काउंट कूपन देण्यासाठी वापरला जातो.

135 आणि 395 रुपयांचा BSNL स्पेशल टॅरिफ व्हाउचर
135 रुपयांच्या पॅकबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये कॉलिंगसाठी 1440 मिनिटे उपलब्ध आहेत. युजर्स कोणत्याही नेटवर्कवर कॉल करू शकतात. मात्र, या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा डेटा मिळत नाही. या पॅकची वैधता 24 दिवस आहे.

395 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचर प्लॅनमध्ये कॉलिंगसाठी 3000 मिनिटे मिळत आहेत. या कॉलिंग मिनिटांच्या समाप्तीनंतर युजर्स 20 पैसे प्रति मिनिट देऊ शकतात. याशिवाय, प्लॅनमध्ये 71 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा मिळतो. दरम्यान, दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर युजर्स 80Kbps वेगाने इंटरनेट वापरू शकतात.

 269 आणि 769 रुपयांचा BSNL रिचार्ज प्लॅन
टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी फेस्टिव्हल धमाका ऑफरही सुरू केली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर STV269 ची प्लॅन लिस्ट आहे आणि अनलिमिटेड कॉलिंग, 2GB डेटा प्रतिदिन ऑफर यासारख्या सुविधा दिल्या जात आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस, बीएसएनएल ट्यून्स, झिंग अॅप ऍक्सेस, इरॉस नाऊ सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहेत. या प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांची आहे.

760 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायते झाल्यास यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये बीएसएनएल ट्यून, दररोज 100 एसएमएस, झिंग अॅप अॅक्सेस आणि इरॉस नाऊ एंटरटेनमेंटचा अॅक्सेस देखील मिळत आहे. या प्लॅनमध्ये लोकधुन अॅपवरील कंटेंटही मोफत मिळवता येईल. बीएसएनएलच्या या प्लॅनची ​​वैधता 90 दिवसांची आहे.

दरम्यान, हे लक्षात घेण्यासारखे आहे की हे चारही विशेष टॅरिफ व्हाउचर आता बंद करण्यात आले आहेत. मात्र, कंपनीने अद्याप हे प्लॅन बंद करण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. सरकारी टेलिकॉम कंपनी जूननंतर देशात 5G नेटवर्क सुरू करण्याचा विचार करत आहे. या सेगमेंटमध्ये बीएसएनएल काही नवीन प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन लॉन्च करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: BSNL Discontinues Four Stvs Including Rs 71 Rs 104 Rs 135 Rs 395 Airtel Effect Launces Festive Dhamaka Offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.