तुम्हीही Google Chrome वापरता का? व्हा सावध, सरकारी एजन्सीकडून अलर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 02:11 PM2022-08-21T14:11:08+5:302022-08-21T14:11:35+5:30

Google Chrome : भारत सरकारच्या एका एजन्सीने हा इशारा दिला आहे. रिपोर्टनुसार, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने युजर्सना एक इशारा दिला आहे.

beware google chrome users indian government has a warning for you | तुम्हीही Google Chrome वापरता का? व्हा सावध, सरकारी एजन्सीकडून अलर्ट!

तुम्हीही Google Chrome वापरता का? व्हा सावध, सरकारी एजन्सीकडून अलर्ट!

Next

नवी दिल्ली : गुगल क्रोम (Google Chrome) हे अतिशय लोकप्रिय वेब ब्राउझर आहे. आता गुगल क्रोमच्या युजर्संना इशारा देण्यात आला आहे. भारत सरकारच्या एका एजन्सीने हा इशारा दिला आहे. रिपोर्टनुसार, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने युजर्सना एक इशारा दिला आहे.

हा इशारा गुगल क्रोम डेस्कटॉप युजर्ससाठी जारी करण्यात आला आहे. त्यानुसार गुगल क्रोममध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे हॅकर्स तुमच्या कॉम्प्युटरचा अॅक्सेस सहज घेऊ शकतात. या " target="_blank"> त्रुटीमुळे सायबर हल्लेखोर सिक्योरिटी रिस्ट्रिक्शनला बायपास करू शकतात.

दरम्यान, CERT-In हे आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत येते. गुगल क्रोममध्ये अनेक कारणांमुळे या त्रुटी असल्याचे सायबर एजन्सीने सांगितले आहे. याचा फायदा घेऊन हॅकर्स टार्गेटेड सिस्टमवर स्पेशली क्रॉफ्टेड रिक्वेस्ट पाठवू शकतात.

यामुळे सायबर हल्लोखोर आर्बिटरी कोड एक्झिक्यूट करू शकतात. हे टार्गेटेड सिस्टमच्या सिक्योरिटी रिस्ट्रिक्शनला बायपास करू शकते. (CVE-2022-2856) त्रुटी खूप वेगाने पसरत आहे. मात्र, एक चांगली गोष्ट म्हणजे कंपनीने माहिती मिळताच या त्रुटी दूर केल्या आहेत.

यासाठी युजर्सला आपले गुगल क्रोम अॅप तात्काळ  लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही गुगल क्रोमचे जुने डेस्कटॉप व्हर्जन वापरत असाल, तर तुम्ही या पॅचला लगेच अॅप्लाय करा. CERT-In ने यापूर्वी Apple iOS, iPadOS आणि macOS मध्ये आढळलेल्या बग्सबाबत चेतावणी दिली होती.

याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. या डिव्हाइसमध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे, रिमोट हल्लेखोरांना टार्गेटेड व्हिक्टिमद्वारे उघडण्यासाठी खास तयार केलेल्या फाइल्स मिळू शकतात. युजर्सला हे डिव्हाइस तात्काळ अपडेट करण्यास सांगण्यात आले होते.

Web Title: beware google chrome users indian government has a warning for you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.